जें जाणणेया विद्यांच्या गांवी। गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गृह्यांचा गोसावी। पवित्रां रावो ।। ९.४७

    27-Jul-2026
Total Views |

dnyaneshwari
या नवव्या अध्यायातज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या म नातील गुह्य गोष्ट श्रोत्यांसमोर प्रकट केली आहे. जिव्हाळ्याचे श्रोते मिळाल्यानंतर वक्त्याच्या चित्तास फुलोरा कसा फुटतो हे ज्ञानेश्वरांनी मागच्या ओवीत सांगितले. आता आणखी काही दृष्टांत देऊन ते आपला मुद्दा स्पष्ट करीत आहेत.
 
कणगेतून धान्यबीज काढून ते मशागत केलेल्या जमिनीत पेरल्यावर व्यर्थ जाते का? म्हणूनच जाे शुद्ध मनाचा आहे, सरळ बुद्धीचा आहे. अनन्य आहे अशा जिवलगास सांगितली जाणारी गाेष्ट भगवान श्रीकृष्ण येथे अर्जुनास सांगत आहेत.अर्जुना, अंत:करणात गुप्त असलेली गाेष्ट सांगण्यासारखा तुझ्याइतका काेणी सद्गुणी पुरुष नाही. म्हणून ही गाेष्ट तुझ्यापासून लपवून ठेवता येत नाही. अर्जुना, मी गुप्त गाेष्ट सांगताे असे वारंवार म्हटल्यामुळे तू कंटाळला असशील. पण खरेच मी तुला विज्ञानासह ज्ञान सांगणार आहे. खरीखाेटी वस्तू एकमेकात मिसळल्यावर ज्याप्रमाणे पारखून घ्यावी लागते, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान यांना अलग करून समजावून घ्यावे लागते.
राजहंस जसा आपल्या चाेचीने दूध व पाणी अलग करताे, त्याप्रमाणे मी तुला ज्ञान व विज्ञान वेगळे करून सांगीन. खराब झालेले धान्य, भूस व बी हे मिळून असते, पण वाऱ्याच्या प्रवाहात काेंडा उडून जाताे व धान्याचा ढीग पडताे, त्याप्रमाणे विज्ञानासहित ज्ञान जाणले की विज्ञानरूपी सर्व संसार ध्यानी येऊन पुरुषाला माेक्षरूपी सिंहासनी बैसविले जाते. जाणण्यास याेग्य अशा वस्तूंमध्ये ब्रह्मविद्या श्रेष्ठ असून तिला आचार्य ही पदवी मिळाली आहे. ही ब्रह्मविद्या गुह्यांचा राजा असून अत्यंत पवित्र आहे.