महाबळेश्वरचा विल्सन पाॅइंट सूर्यास्तानंतर बंद राहणार

    25-Jul-2026
Total Views |
 
Mahabaleshwar
 
महाबळेश्वर, 24 जुलै (आ.प्र.) : येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेला विल्सन पाॅइट सूर्यास्तानंतर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी बंद राहणार आहे. सूर्यास्तापासून ते सूर्याेदयापर्यंत विल्सन पाॅइंट परिसरात वन विभागाकडून नियमित गस्त आणि देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल महादेव माेहिते यांनी सांगितले.
 
शहरापासून जवळ आणि सर्वाधिक उंच ठिकाण म्हणून ओळखला जाणारा विल्सन पाॅइंट बारा महिने सुरू असणारे पर्यटनस्थळ आहे. सूर्याे दयाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक माेठ्या संख्येने येथे येतात. स्थानिक नागरिक माॅर्निंग, इव्हिनिंग वाॅक, तसेच आराेग्यविषयक उपक्रमांसाठी या परिसरात येतात. विल्सन पाॅइंमट परिसरात रात्री मद्यपान, गांजाचे सेवन तसेच इतर बेकायदा प्रकार वाढल्याच्या तक्रारी सातत्याने वन विभागाकडे येत हाेत्या. त्यामुळे वन विभागाने विल्सन पाॅइंट सूर्यास्तानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सूर्याेदयावेळी पर्यटकांना प्रवेश खुला असणार आहे. वन विभागाकडून या परिसरात आता नियमित गस्त आणि देखरेख ठेवण्यात येणार आहे.