6 मे हा ‘इंटरनॅशनल नाे डायट डे’ आहे. आज हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, बहुतांश डाएट प्लॅन्स अल्प काळात का अयशस्वी ठरतात. या दिवसाचा उद्देश डायटिंगच्या क्रेझला प्राेत्साहन देणे नसून, निराेगी ‘बाॅडी-इमेज’ आणि अन्नाशी संतुलित व्यवहार समजून घेणे हा आहे. आंधळेपणाने डायटिंग करण्यापेक्षा ‘माइंडफुल ईटिंग’ आपल्या जीवनशैलीचा भाग कसा बनवता येईल, हे तज्ज्ञांकडून समजून घेऊया.
डायटिंगच्या तणावाला म्हणा ‘बाय-बाय’ डायटिंगचे कडक नियम आणि काय खावे व काय खाऊ नये याची सततची ओढाताण शरीर आणि मनावर प्रचंड ताण (स्ट्रेस) निर्माण करते. जेव्हा हा ताण वाढताे, तेव्हा वजन कमी हाेण्याऐवजी उलट वाढू लागते किंवा शरीरावर त्याचे विपरित परिणाम हाेतात. 6 मे हा इंटरनॅशनल नाे डाएट डे असताे. त्यानिमित्ताने, डायटिंगच्या कडक नियमांपेक्षा माइंडफुल ईटिंग कसे फायदेशीर ठरू शकते, हे समजून घेऊया : उद्यापासून मी नक्की डायटिंग सुरू करणार! आपल्यापैकी असा क्वचितच काेणी असेल ज्याने स्वतःला हे वचन दिले नसेल. पण डायटिंगचा प्रवास सुरू झाला की मन आणि शरीर यांच्यात युद्ध सुरू हाेते. जाे पदार्थ आतापर्यंत सामान्य वाटत हाेता, ताे वर्ज्य केल्यामुळे अधिकच आकर्षक वाटू लागताे. दिवसभर उपाशी राहून आवडते पदार्थ न खाण्याचा ताण घेतल्यामुळे शेवटी रात्री कंटाळून आपण गरजेपेक्षा जास्त खाताे आणि मग पश्चात्ताप हाेताे.
सजगपणे खाण्याचा आनंद घ्या काेमल मेहता पुढे सांगतात की, आवडत्या पदार्थांना नकार देण्यापेक्षा ते पूर्ण सजगतेने खा. जेव्हा तुम्ही स्वतःला खाण्याची मुभा देता, तेव्हा ती गाेष्ट तुमच्यासाठी दुर्मिळ राहत नाही आणि खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग्स) नैसर्गिकरित्या कमी हाेते. दुसरी महत्त्वाची गाेष्ट म्हणजे घाईघाईत जेवल्यामुळे शरीराला मपाेट भरले आहेफ हे संकेत समजायला वेळ मिळत नाही. जेवताना माेबाईल किंवा टीव्हीमध्ये मग्न राहणे ही एक ममाइंडलेसफ क्रिया आहे. प्रत्येक घास नीट चावून खाल्ला पाहिजे आणि मुख्य जेवणासाठी किमान 15 ते 20 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे. शांत मन आणि कुटुंबासाेबतच्या गप्पा पचनक्रिया आणि हार्माेन्सल सिस्टिम सुधारण्यास मदत करतात.
समारंभात जाताना काय करावे? माइंडफुलनेस म्हणजे आपली संस्कृती किंवा आदरातिथ्याचा अस्वीकार करणे नव्हे, तर जाणीवपूर्वक निवड करणे हाेय. काेमल मेहता सांगतात, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मी माझ्या क्लायंट्सना असा सल्ला देते की सर्व पदार्थ घ्या, पण अगदी थाेड्या प्रमाणात.
यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही. यजमानांना वाईट वाटू नये म्हणून तुम्ही पदार्थांचे काैतुक करू शकता. हळूहळू जेवल्यामुळे तुमच्या ताटात नेहमी काहीतरी असेल, ज्यामुळे वारंवार वाढण्याचा आग्रह टाळता येताे. स्वतःच्या शरीराचा आदर करणे म्हणजे दुसऱ्याचा अपमान करणे नव्हे, फक्त या गाेष्टींमध्ये समताेल राखण्याची गरज आहे.
डायटिंग हा शब्दच नसावा लहानपणी आपण कधीही कॅलरी, प्राेटीन किंवा कार्बाेहायड्रेट्स माेजत नव्हताे आणि अन्नाला घाबरतही नव्हताे. काेमल मेहता पुढे सांगतात की, आपण या नैसर्गिक समजासहच जन्माला आलाे आहाेत, पण सध्या आपण त्याचा वापर करायला विसरलाे आहाेत.
आज आपल्याला एखाद्या सेलिब्रिटी किंवा न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याची गरज भासते, पण सत्य हे आहे की, आहार तुमच्या जीवनशैलीनुसार असावा, न की तुम्हाला डाएट-प्लॅननुसार तुमचे आयुष्य बदलावे लागावे. डाएटसाठी वेगळा स्वयंपाक करणे हे एक कंटाळवाणे काम बनते जे जास्त काळ टिकत नाही. तुमचे शरीर तुमच्याशी सतत बाेलत असते; फक्त ते ऐकण्याची गरज आहे. तुम्ही किती खावे हे काेणताही आहारतज्ज्ञ तुम्हाला सांगू शकत नाही, तुमचे शरीरच तुम्हाला तसे संकेत देईल. जे प्लॅन्स शाश्वत असतात आणि ज्यामध्ये तुम्ही समाधानी आणि आनंदी राहू शकता, तेच यशस्वी ठरतात.
माइंडफुल ईटिंगच्या प्रॅक्टिकल टिप्स:
स्क्रीनपासून दूर राहा : जेवताना टीव्ही, माेबाईल किंवा लॅपटाॅप पूर्णपणे बंद ठेवा. स्क्रीनसमाेर असताना मेंदू भूकेचे संकेत ओळखणे विसरताे.
पंचेंद्रियांचा वापर करा : अन्न पाहताच खायला सुरुवात करू नका. आधी त्याचा सुगंध घ्या, रंग पहा आणि प्रत्येक घासाच्या पाेताचा (टेक्सचर) अनुभव घ्या.
चावण्यावर लक्ष द्या : एक घास ताेंडात घेतल्यावर चमचा किंवा हात खाली ठेवा. जाेपर्यंत अन्न द्रवासारखे (लिक्विड) हाेत नाही, ताेपर्यंत ते चावा. यामुळे पचन साेपे हाेते.