आपल्या निग्रहाने लठ्ठपणा निश्चितच दूर हाेईल

    24-Jul-2026
Total Views |
 
causes-cancer-risk-and-weight-loss-myths
 
जीवनशैलीसंबंधित कित्येक आजार जगभरात वेगाने आपले पाय पसरत आहेत आणि या सर्व आजारांच्या मुळाशी आहे लठ्ठपणा. जर प्रभावी पावले उचलली नाही तर 2035 पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा जास्त लाेक लठ्ठपणाची शिकार हाेतील. महिला फ्नत लठ्ठपणाचीच शिकार हाेत नाहीत तर लठ्ठपणामुळे महिलांमध्ये सुमारे सात प्रकारच्या कॅन्सरचा धाेकाही 40 ट्न्नयांपर्यंत वाढत जाताे. माेठ्या संख्येत मुलांमध्ये माेठे झाल्यानंतर स्ट्राेक, डायबिटीस, हृदयविकार आणि अस्थमाचा धाेका केवळ यामुळे वाढताे की, ती जेव्हा आईच्या गर्भात हाेती तेव्हा त्यांची आई लठ्ठपणाने पीडित हाेती. पण मुख्य प्रश्न हा आहे की, महिला वेगाने लठ्ठपणाची शिकार का हाेत आहेत? आपण का हाेत आहाेत शिकार? आपल्यासाठी वजन वाढणे एक गंभीर समस्या आहे, कारण लठ्ठपणासाेबत डायबिटीस ते हृदयविकार अशा अनेक समस्या असतात.
 
जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीरात हाेणारे हार्माेनल बदल महिलांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणाला मुख्यत्वे जबाबदार आहेत. पीरियडच्या वयात पीसीओएस म्हणजेच पाॅलीसीस्टिक ओव्हरी सिंड्राेमसारख्या समस्या त्यांना लठ्ठ बनवत आहे तर मेनाेपाॅजनंतर हार्माेन निर्मिती अभावी लठ्ठपणा वाढत राहताे.
 
वजन वाढण्याचे आणखी एक कारण तणावही आहे. तणावामुळेही लठ्ठपणा येताे. खूप जास्त तणावामुळे शरीरात कार्टिसाेल नावाच्या हार्माेनची निर्मिती हाेते. तणावात सकस आहार घेऊनही कसलाही फायदा हाेत नाही. कारण तणावामुळे वाढणारे कार्टिसाेल हार्माेन मेटाबाॅलिज्म सुस्त करते.
 
ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचू शकत नाही व वजन वाढत जाते. तणावामुळे ब्लड शुगरची पातळीही खूप वेगाने वर-खाली हाेत असते. तसेच तणावामुळे शरीरात काेलेस्ट्राॅलची पातळीही वाढते व काेलेस्ट्राॅल वाढल्यामुळे वजन वाढते. जर आपण तणाव व्यवस्थित करण्यासाठी अँटी-डिप्रेसेंट औषधे घेत असाल तर त्याच्या प्रभाानेही वजन वाढू लागते.
 
कुशिंग सिंड्राेम तर नाही ना? जसजसे महिलांचे वय वाढते, ते तरुणपणासारखे शारीरिक रुपाने सक्रिय राहू शकत नाहीत आणि व्यायामही करू शकत नाहीत. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये महिला सर्वप्रथम फिटनेसशी तडजाेड करतात.
 
कल्पनांनी वजन कमी हाेणार नाही
 वजन घटवण्याचा काेणताही एकमेव अशी पद्धत नाही ज्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकताे. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि आपल्या लक्ष्यात आपण ताेपर्यंत यशस्वी हाेऊ शकत नाही जाेपर्यंत आपण वजन घटवण्याच्या एकापेक्षा जास्त पद्धतींत सामंजस्य स्थापन करू शकत नाही.
 असा आहार जाे काही खास प्रकारचे अन्न खाल्ल्यास आपण वजन कमी करू शकता तें आपले नुकसान करू शकते. क्रॅश हाइटने आपण वजन वजन घटवण्याचे आपले लक्ष्य गाठण्याची श्नयता खूप कमी असते, पण कायमस्वरूपी आपले वजन थाेडे अधिक वाढण्याची श्नयता मात्र असू शकते.
 बटाटे व भात इ. खाल्ल्यामुळे वजन वाढते पण सत्य हे आहे की, याेग्य प्रमाणात हे घेतल्यास वजन वाढत नाही. भात व बटाट्यात फायबर नसते त्यामुहे यासाेबत काही ताज्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जाताे.