शरीरात पाणी कमी झाल्यास अनेक समस्या उद्भवतात

    24-Jul-2026
Total Views |
 
Water
 
डाॅक्टरांच्या मते, शरीरातील 1% द्रव कमी झाल्यास संपूर्ण शरीरयंत्रणेच्या कार्यात बिघाड हाेऊ शकताे, पाणी पिण्याबाबत दैनंदिन शिफारस केलेली प्रमाणे निश्चित असली, तरीही शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यासाठी काही वेळा त्यापेक्षा अधिक प्रमाणात द्रव घेणे आवश्यक असते.
 
पाणी आपल्या शरीरासाठी आणि आराेग्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्वाचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डाॅक्टरही नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण तरीही काही लाेक काही कारणांनी दिवसभर भरपूर पाणी पिऊ शकत नाहीत.
अशात त्यांना आराेग्या संबंधी वेगवेगळ्या समस्या हाेतात. कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धाेका वाढताे.
 
पाणी कमी पिण्याचा थेट प्रभाव हृदयाच्या आराेग्यावर पडताे. कारण डिहायड्रेशनमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर वाईट प्रभाव पडताे.
 
ज्यात हार्ट अटॅक आणि कार्डियाेवस्कुलर सिस्टमचा समावेश आहे. अशात आज या लेखात आम्ही तुम्हाला पाणी कमी प्यायल्याने हृदयावर काय परिणाम हाेताे ते सांगणार आहाेत.
 
अनियमित हार्ट बीट : शरीरात इलेक्ट्राेलाइट्सचं संतुलन कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. जेव्हा शरीरात पाणी कमी हाेतं तेव्हा इलेक्ट्राेलाइट्स असंतुलित हाेतात, ज्याचा प्रभाव हृदयाच्या ठाेक्यांवर पडताे.
 
ब्लड फ्लाे कमी हाेताे : पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट हाेऊ शकतं. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी हाेताे. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडताे. या स्थितीमुळे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धाेका वाढताे.
 
एका दिवसात किती पाणी प्यावं? सामान्यपणे राेज किती पाणी प्यावं हे वय, वजन, वातावरण आणि कामावर अवलंबून असतं.
एक्सपर्टनुसार, निराेगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. इतकं पाणी प्यायल्याने किडनी संबंधी आजारांचा धाेका कमी हाेताे आणि पचन क्रियाही चांगली हाेते.
 
शरीराचं तापमान असंतुलित हाेतं : पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पाणी कमी झालं तर शरीराचं तापमान असंतुलित हाेतं, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव पडताे.किडनी आणि हृदयाचा संबंध : तुम्ही पाणी कमी प्याल तर याचा प्रभाव किडनीवरही पडताे आणि किडनीमध्ये काही समस्या झाली तर याचा नकारात्मक प्रभाव हृदयावर पडताे. कारण दाेन्ही अवयवांचं एकमेकां साेबत संबंध असताे.
 
मेटाबाॅलिज्मवर प्रभाव : पाणी कमी प्यायल्यामुळे मेटाबाॅल्जिम स्लाे हाेतं. ज्यामुळे शरीरात फॅट आणि टाॅक्सिन्स वाढण्याचा धाेका असताे. अशात हृदयाच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा हाेण्याचा धाेकाही अधिक वाढताे.
 
रिकाम्या पाेटी पाणी पिण्याचे फायदे : जर तुम्ही राेज सकाळी झाेपेतून उठल्यावर पाणी पित असाल तर ही सवय तुम्हाला निराेगी ठेवण्यास खूप फायदेशीर आहे. असं केल्याने पाेट सकाळी साफ हाेतं आणि अनेक आजारांचा धाेका कमी हाेताे.
जेवण केल्यावर पाणी जास्त पिऊ नये, तसेच जेवण करतानाही पाणी पिणं टाळलं पाहिजे. याने अन्न चांगलं पचन हाेतं.