पंढरपूर, 23 जुलै (आ.प्र.) : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसूर पाटी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेताना केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे त्यांनी काही काळ सारथ्यही केले.
वारीत चालणारे सर्व वारकरी माउलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाने वारीत उत्तम सुविधा दिल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्याही माेजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वाेच्च प्राधान्य देण्यात आले असून, त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शाैचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आराेग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा याेग आला, हे माझे माेठे भाग्य आहे, अशी भावनाही त्यांनी व्य्नत केली. या वेळी पालकमंत्री जयकुमार गाेरे व जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.