आषाढी एकादशीनिमित्त आज दादर-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार

    24-Jul-2026
Total Views |

Pandharpur Special Train  
मुंबई, 23 जुलै (आ.प्र.) : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एका फेरीसह एकूण दाेन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुंबई व उपनगरातील वारकऱ्यांना थेट पंढरपूर गाठण्याची साेय हाेणार आहे.
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01045 विशेष रेल्वे 24 जुलैस दुपारी 12.50 वाजता दादरहून सुटून त्याच दिवशी रात्री 9.15 वाजता पंढरपूरला पाेहाेचेल. गाडी क्रमांक 01046 विशेष रेल्वे 26 जुलैस मध्यरात्री 12.15 वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता दादरला पाेहाेचेल. या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लाेणावळा, पुणे, दाैंड आणि कुर्डूवाडी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दाेन तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे, दहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी; तसेच दाेन द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, असे एकूण 18 डबे असतील. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी झाल्यास आवश्यकतेनुसार आणखी विशेष रेल्वे चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.