अहमदाबाद, 21 जुलै (वि.प्र.) : प्लास्टिक हे दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. प्लास्टिकच्या पिशव्या इतक्या गरजेच्या झाल्या आहेत की त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. प्लास्टिक पिशवीबाबत काही धक्कादायक तथ्ये समाेर आली आहेत, जी तुम्हाला प्लास्टिकचा वापर टाळण्याचा विचार करण्यास भाग पाडतील. प्लास्टिक नष्ट हाेत नाही आणि जमिनीत पुरले तरी त्याला विघटित हाेण्यासाठी 1000 वर्षांपर्यंतचा कालावधी लागताे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर इतका बेसुमार आणि अनियंत्रित झाला आहे की, भारतात दरराेज 100 हून अधिक प्राणी प्लास्टिक खाल्ल्यामुळे मरतात. गुजरात प्लास्टिक कचऱ्याच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
1862 मध्ये इंग्लंडच्या अलेक्झांडर पार्कर यांनी शाेधलेले प्लास्टिक आज सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. प्लास्टिकशिवाय अनेक दैनंदिन कामे करता येत नाहीत. परंतु, प्लास्टिक हे एक अविनाशी प्रदूषण आहे आणि ते माती, पाणी व हवा काही वेळा फक्त एका मिनिटासाठी वापरली जाते. परंतु, मातीत विघटित हाेण्यासाठी त्याला हजाराे वर्षे लागतात. प्लास्टिक कचऱ्याचा माती, नद्या आणि सागरी जिवांवर गंभीर परिणाम हाेताे.
सध्या प्लास्टिकचा वापर सातत्याने वाढत आहे. अन्न आणि पाणी प्लास्टिक प्रदूषणापासून सुटलेले नाहीत.
दैनंदिन जीवनात, प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारे तुंबतात आणि अन्नासाेबतच प्लास्टिक प्राण्यांच्या आराेग्यालाही हानी पाेहाेचवते. इतर अन्नासाेबत टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्याने अनेक प्राणी मरतात आणि या मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट केल्यानंतरही प्लास्टिक तसेच राहते.
अनधिकृत आकडेवारीनुसार, भारतात दरराेज 100 प्राणी पाेटात प्लास्टिक गेल्यामुळे मरतात. प्लास्टिक प्रदूषणामुळे गंभीर वायुप्रदूषण हाेते, जे श्वासावाटे आत घेतल्यास धाेकादायक ठरू शकते. गुजरात प्लास्टिक उत्पादनात आघाडीवर आहे, पण प्लास्टिक प्रदूषणामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले राज्यही तेच आहे. भारतातील प्लास्टिक उत्पादन उद्याेगांची वार्षिक उलाढाल 3.9 लाख काेटी रुपये आहे.
ई-काॅमर्स आणि खाद्यसेवा उद्याेगांमुळे प्लास्टिकच्या वापरात माेठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, भारत दरवर्षी 1 लाख काेटी रुपयांच्या प्लास्टिकची निर्यात करताे, ज्यात अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती (णअए) आघाडीवर आहेत. देशाच्या एकूण प्लास्टिक वापरापैकी 46 टक्के वापर पश्चिम भारतात हाेताे. भारतात दरवर्षी 90 लाख ते 1 काेटी टन प्लास्टिक कचरा निर्माण हाेताे, आणि हा दर दरराेज 25,000 टनांपेक्षा जास्त आहे.
प्लास्टिक कचऱ्याच्या बाबतीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅरी बॅग, प्लास्टिकच्या बाटल्या, कप, प्लेट्स आणि पॅकेजिंग यांसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू हे प्लास्टिक कचऱ्याचे मुख्य प्रकार आहेत.
मायक्राेप्लास्टिकचा पर्यावरणावर गंभीर परिणाम हाेताे.
एक जागरूक नागरिक म्हणून, सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या युगात प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणासाठी आणि आराेग्यासाठी अत्यंत हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिक प्रदूषणापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि पुनर्वापर करता येण्याजाेग्या वस्तू वापरणे ही काळाची गरज आहे. शक्यताेवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा आणि कापडी पिशव्या वापरा.'
भारतात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपैकी 40 टक्के प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरले जाते. प्लास्टिक प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत, सरकारने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या 19 उत्पादनांवर बंदी घातली आहे. यामध्ये प्लास्टिकचे झेंडे, प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, कटलरी, फुग्यांसाठीच्या प्लास्टिकच्या काड्या, सिगारेटची पाकिटे, स्ट्राॅ, काटे, ट्रे, चमचे, वस्तू पॅक करण्यासाठीची फिल्म, पॅडल्स यांचा समावेश आहे.