मुंबई, 21 जुलै (आ.प्र.) : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने 22 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर विशेष शिबिरांचे आयाेजन करण्यात येणार आहे. या विशेष माेहिमेद्वारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध मर्यादेत नव्याने शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत.
शासनाचे विभाग अधिक लाेकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. एकही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा याेजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हा उद्देश समाेर ठेवून पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा याेजनेत तातडीने समावेश करण्यासाठी ही माेहीम राबवण्यात येत आहे.