लाेणावळा, 21 जुलै (आ.प्र.) : देश-विदेशातील पर्यटकांची पसंती मिळवलेल्या आणि लाेणावळ्याची ओळख ठरलेल्या प्रसिद्ध लाेणावळा च्निकीला भाैगाेलिक (जीआय) मानांकन मिळाले.
चेन्नईतील भाैगाेलिक मानांकन नाेंदणी कार्यालयाने ‘च्निकी ऑफ लाेणावळा’ या नावाची अधिकृत नाेंदणी केली असून, त्यामुळे या पारंपरिक उत्पादनाला कायदेशीर संरक्षणासह जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.
या मानांकनासाठी 29 ऑगस्ट 2022 राेजी अर्ज दाखल करण्यात आला हाेता.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 28 मार्च 2026 राेजी नाेंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भाैगाेलिक मानांकनामुळे लाेणावळा च्निकी या नावाचा अनधिकृत वापर राेखण्यास मदत हाेणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल लाेणावळा च्निकीची खात्री मिळेल, तर स्थानिक उत्पादकांच्या हक्कांचे संरक्षण हाेईल.
याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उत्पादनाची विश्वासार्हता वाढून निर्यातीला चालना मिळेल. पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ हाेण्याची अपेक्षा आहे.
लाेणावळ्यातील च्निकी उद्याेगाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे.
शेंगदाणा, गूळ, साखर, तीळ, काजू, बदाम, पिस्ता आदींपासून तयार हाेणाऱ्या विविध प्रकारच्या च्निकीमुळे लाेणावळ्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखाे पर्यटक येथील च्निकी खरेदी करतात. त्यामुळे हा उद्याेग शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानला जाताे. या मानांकनासाठी लाेणावळा शहर च्निकी असाेसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार पारख यांनी पाठपुरावा केला. बाैद्धिक संपदा ह्नक विषयातील तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली.