पर्यावरण वाचवणे ही आपली जबाबदारी

    22-Jul-2026
Total Views |

Environmental Awareness  
आपल्या आसपासचे नैसर्गिक आवरण म्हणजे पर्यावरण. संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व पर्यावरणावर अवलंबून आहे. नैसर्गिक पर्यावरण अनेक विजातीय किंवा विविध घटकांचे बनलेले असते. प्रत्येक जीवाची सर्व क्रिया नैसर्गिक पर्यावरणावर आधारित असते.
 
साेप्या शब्दांत सांगायचे तर, व्यक्तीची एकूण परिस्थिती ज्यामध्ये व्यक्तीला राहायचे असते, ते लाेक व परिस्थितीसंयाेग म्हणजे पर्यावरण. पर्यावरण ही खूप गुंतागुंतीची बाब आहे. त्यात निर्जीव, जीव-जैव व मानवजातीचा समावेश हाेताे. जीवन व विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांची बेरीज म्हणजे सजीवांचे पर्यावरण. निराेगी जीवनासाठी पर्यावरण शुद्ध असणे महत्त्वाचे आहे.
पर्यावरणाच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. जगातील अनेक देश पर्यावरणासाठी चिंतेत आहेत, पण अजूनही जागरूकता कमी आहे. जागतिक पर्यावरण दिन पाच जून राेजी साजरा केला जाताे. मानव आपल्या उपभाेग आणि चैन (माैजमजा) करण्याच्या वस्तूंसाठी पर्यावरणाचे नुकसान करणारा ठरला आहे.
 
पर्यावरणासाठीचे नैसर्गिक संसाधने म्हणजे झाडे, जंगलातील वृक्षांचा अतिरेकी नाश हाेत आहे. सध्या सुरू असलेली युद्धे सुद्धा नैसर्गिकरित्या जमिनीत गाडलेल्या खनिजांसाठी हाेत आहेत, ज्यामुळे पर्यावरण दूषित हाेत आहे. वृक्षांच्या नाशाने पाण्याचीही टंचाई निर्माण हाेत आहे.
 
ही सर्व कारणे तर सर्वांना ठाऊक आहेत, पण खरी कारणे काेणी स्वीकारायला तयार नाही किंवा त्याकडे लाेकांचे लक्ष नाही. प्रत्येक व्यक्ती यासाठी जबाबदार आहे. प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाचे नुकसान खूप माेठ्या प्रमाणावर करत आहे. जगातील देश पर्यावरणासाठी पावले उचलतात, पण केवळ काही झाडे लावल्याने या समस्येचे निराकरण हाेणार नाही, खराेखर मुळ कारणांनाच ठेचले पाहिजे.
 
आधुनिक यंत्रे (मशिन्स) एकाेणिसाव्या शतकात खूप माेठ्या प्रमाणावर विकसित झाली. त्याचे फायदे विकासासाठी झाले, पण या विकासामुळे पर्यावरणाचे खूप माेठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे, जाे आजचा गंभीर विषय आहे. प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे, हे मी यासाठी म्हणताे कारण या आधुनिकतेपासून काेणीही वाचू शकलेले नाही.
 
कारखान्यात बनणारे खाद्यपदार्थ जसे की साखर, रिफाइंड तेल, साेडा, चहा, काॅफी, बेकरी प्राॅडक्ट्स, टूथपेस्ट, आईस्क्रीम, चाॅकलेट, प्रिझर्व्हेटिव्ह टाकून बनणारे खाद्यपदार्थ आणि फरसाण जे फॅक्टरीत बनतात, या सर्व पदार्थांमुळे वातावरण अधिक प्रदूषित हाेते. मानवाचे आराेग्य बिघडते, त्यासाठीची औषधे, जी केमिकल्स पासून बनतात, त्या प्रदूषणाने पर्यावरणाला हानी पाेहाेचते.त्यासाठी प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे.