बाळूमामा देवस्थान मंदिरात 60 काेटींचा घाेटाळा!

उपनिबंधक आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल सांगली, 21 जुलै (आ.प्र.) :

    22-Jul-2026
Total Views |
 
60-crore-scam-deputy-registrar
 
काेल्हापूर, 21 जुलै (आ.प्र.): बाळूमामा देवस्थान (आदमापूर) मंदिरात 60 काेटी रुपयांचा महाघाेटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात थेट उपनिबंधक रागिणी खडके आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या अधिकाऱ्याची नियु्नती मंदिर प्रशासनातील पारदर्शकता आणि तपासणीसाठी करण्यात आली हाेती, त्यांनीच या घाेटाळ्यात मुख्य भूमिका बजावल्याचे समाेर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
आराेपींनी मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आणि मालमत्तेच्या नाेंदींमध्ये बनावट कागदपत्रे व दस्त तयार करून माेठ्या प्रमाणावर फेरफार केला. मंदिराच्या खात्यातील आणि भाविकांनी दिलेल्या दानातील तब्बल 60 काेटी रुपयांचा निधी बेकायदा वळवण्यात आला. उपनिबंधक या शासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या रागिणी खडके यांच्याकडे देवस्थानच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी हाेती. मात्र, तपासणीच्या नावाखाली त्यांनीच पदाचा गैरवापर करत हा घाेटाळा घडवून आणला.
 
उपनिबंधक रागिणी खडके आणि बाळूमामा देवस्थान समितीचे तत्कालीन व विद्यमान पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय पदाचा गैरवापर करून अपहार करणे असे आराेप करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखाेल तपास सुरू आहे.
 
श्री संत बाळूमामा यांच्या आदमापूर येथील मंदिराला दरवर्षी लाखाे भाविक भेट देतात आणि काेट्यवधींचे दान जमा हाेते. भाविकांच्या श्रद्धेचा आणि पैशाचा असा गैरवापर झाल्याचे समाेर आल्याने वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये तीव्र संताप व्य्नत केला जात आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील मूळ दस्तऐवजांची तपासणी सुरू असून, घाेटाळ्याची व्याप्ती आणि यातील इतर सहभागी व्य्नतींची नावे लवकरच समाेर येण्याची शक्यता आहे.