वारणा, काेयना धरण क्षेत्रात पावसाने कर्नाटकातील अलमट्टी 76 ट्नके भरल

    22-Jul-2026
Total Views |
 
almatti-dam-76
 
सांगली, 21 जुलै (आ.प्र.) : काेयना व वारणा धरण क्षेत्रातील संततधारेने कर्नाटकातील अलमट्टी धरण 76 ट्नके भरल्याने सांगली आणि काेल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा काठच्या गावांची चिंता वाढली आहे. सध्या काेयना व वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला नसला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेला संततधारेने आणि अलमट्टीतील वाढत्या पाणीसाठ्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
 
अलमट्टी धरणाची 123 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून, धरणात सध्या 93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास 76 ट्नके भरले आहे. दुसरीकडे काेयना धरण 55 ट्नके, तर वारणा धरण 65 ट्नके भरले आहे. या दाेन्ही धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाचा जाेर कायम असून, शिराळा तालुक्यात संततधार कायम आहे.
 
सध्या कृष्णा नदीतून केवळ पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र, काेयना व वारणा धरण क्षेत्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कायम राहिल्यास धरणांतून विसर्ग सुरू करण्याची वेळ येऊ शकते.
 
अशावेळी अलमट्टी धरण अल्पावधीत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर अलमट्टीचा फुगवटा आणि वरच्या धरणांतील पाण्यामुळे कृष्णा नदीला माेठा फुगवटा येऊ शकताे. हीच परिस्थिती सांगली व काेल्हापूर जिल्ह्यात महापुरास कारणीभूत ठरू शकते.
 
त्यामुळेच कृष्णाकाठच्या गावांची चिंता वाढली आहे.