संध्यानंद.काॅम आपल्याला अनेकदा असे वाटते की, उच्च आत्मविश्वास, अद्भुत आकर्षण आणि संभाषणावरील प्रभुत्व हे ‘पहिल्या भेटीत छाप’ पाडण्यासाठी पुरेसे आहे. संशाेधनातून हे सिद्ध झाले आहे की, हे गुण तुम्हाला आवडण्यासारखे बनवतात, पण, ‘अविस्मरणीय’ बनवतीलच असे नाही.
इतरांना आकर्षित करण्यासाठी अनेक गाेष्टी महत्त्वाच्या पहिल्या भेटीत आपण लाेकांना केवळ आवडावे की त्यांना आपण अविस्मरणीय वाटावे, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. वर्तन विश्लेषक वेंडी पॅट्रिक यांनी ‘सायकाॅलाॅजी टुडे’मधील त्यांच्या अलीकडील विश्लेषणात ही द्विधावस्था साेडवली आहे. पूर्वी सांगितले जायचे की, जसे आहात, तसे राहा. पण, लाेकांना तुमच्याकडे आकर्षितकरण्यासाठी कितीतरी अधिक खाेल गाेष्टी गरजेच्या असतात.
वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीतून मिळणारी लाेकप्रियता वरवरची मार्टजे बुस यांच्या अभ्यासानुसार, जे लाेक गटांवर वर्चस्व गाजवतात किंवा बहिर्मुखी वर्तन प्रदर्शित करतात ते नेटवर्किंग इव्हेंट्स आणि सामाजिक मेळाव्यांमध्ये पटकन लाेकप्रिय हाेतात.
जे संभाषणावर नियंत्रण ठेवतात आणि आत्मविश्वास दाखवतात ते लाेकांच्या नजरेत येतात, परंतु ही लाेकप्रियता अनेकदा वरवरची असते.
वर्चस्ववादी आणि मैत्रीपूर्ण वागणाऱ्यांची तुलना ‘युनिकली लाइ्नड’ म्हणजे तुम्ही सगळ्यांना आवडण्याचे रहस्य माइकल डफनर आणि साशा क्राउसे यांच्या अभ्यासात उघड झाले आहे. त्यांनी 139 अनाेळखी व्य्नतींच्या परस्पर भेटींचा अभ्यास केला. त्यांनी दाेन प्रकारच्या वर्तनांची तुलना केली.