जगातील 92 टक्के लाेकांना कर्कराेगाचा धाेका; जागतिक आराेग्य संघटनेचा इशारा

    20-Jul-2026
Total Views |

Cancer Awareness  
नवी दिल्ली, 19 जुलै (वि.प्र.) जागतिक आराेग्य संघटनेने (थकज) एका वार्षिक अहवालात चिंता व्यक्त केली आहे की, कर्कराेग हा आपल्या विचारापेक्षा अधिक धाेकादायक ठरू शकताे.
 
25 वर्षांनंतर कर्कराेग रुग्णांची संख्या मर्यादेपलीकडे वाढण्याची भीती आहे. सध्या दरवर्षी 20 लाख नवीन रुग्णांची नाेंद हाेते.
 
दुसरीकडे 2050 मध्ये दरवर्षी 3.5 काेटी नवीन रुग्णांची नाेंद हाेईल. जागतिक आराेग्य संघटनेने असेही म्हटले आहे की, जगातील 92 टक्के लाेकांना कर्कराेगाचा धाेका आहे आणि कुटुंबांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.
 
डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे की, कर्कराेग रुग्णांची संख्या दरवर्षी पाच ते सात ट्न्नयांनी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, कर्कराेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या घडीला जगात पाच काेटींहून अधिक कर्कराेगाचे रुग्ण आहेत.
 
दरवर्षी एक काेटी लाेकांचा कर्कराेगामुळे मृत्यू हाेताे आणि सुमारे दाेन काेटी नवीन रुग्णांची नाेंद हाेत आहे. येत्या काही वर्षांत हा वेग आणखी वाढेल.
 
2050 पर्यंत, म्हणजेच पुढील 25 वर्षांत, दरवर्षी साडेतीन काेटींहून अधिक रुग्णांची नाेंद हाेईल. जगातील 92 टक्के लाेकसंख्येला कर्कराेगाचा धाेका असेल.
 
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कर्कराेग हाेण्याचा धाेका असेल. जगात दरराेज 26 हजार लाेकांचा कर्कराेगामुळे मृत्यू हाेताे.
जगात हृदयविकारानंतर कर्कराेग हे मृत्यूचे दुसरे सर्वांत माेठे कारण आहे.
 
दरम्यान, पीअर रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जे लाेक कार्यालयात आठ ते दहा तास बसून काम करतात, त्यांना कर्कराेगाचा धाेका वाढताे.
 
जे लाेक कार्यालयात आठ ते दहा तास घालवत नाहीत आणि सकाळचा फेरफटका किंवा व्यायाम पुरेसा आहे असे मानतात, त्यांचा गैरसमज आहे. तेवढा व्यायाम केल्यानेही कर्कराेगाचा धाेका कमी हाेऊ शकत नाही. 12 वर्षे 91 हजार लाेकांवर संशाेधन करून सादर केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, जे लाेक 30 मिनिटे सतत बसून राहतात, त्यांनाही धाेका वाढताे. जे लाेक बसून राहण्याच्या मधल्या वेळेत थाेडी शारीरिक हालचाल करतात, त्यांच्यामध्ये कर्कराेगाचा धाेका कमी हाेताे.