राज्याची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला; वस्त्राेद्याेग प्रदर्शनाचे उद्घाटन

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन सुरू; अस्सल पैठणी, करवत काठी साड्यांचे आकर्षण

    20-Jul-2026
Total Views |
 
नवी दिल्ली, 19 जुलै (आ.प्र.) : महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदनाच्या विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयाेजित विशेष वस्त्राेद्याेग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयु्नत तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. प्रगती मैदानातील भारत मंडपममध्ये नुकत्याच झालेल्या भारत टेक्स-2026च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्राेद्याेग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात 20 जुलैपर्यंत वस्त्राेद्याेग प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयु्नत नितीन शेंडे, सहायक निवासी आयु्नत स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमाेद काेलापटे तसेच रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डाॅ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशाेक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी उपस्थित हाेते. दिल्लीकरांनी या प्रदर्शनाला माेठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन सिंघल यांनी केले. या प्रदर्शनात राज्याच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार आहे. अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, साेलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टाॅवेल्स, काेल्हापुरी चपलांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.