संध्यानंद.काॅम कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात जेव्हा तुम्ही काेणाला भेटता, तेव्हा तुम्हाला पटकन निर्णय घ्यावा लागताे, हस्तांदाेलन करायचे, हात हलवायचा की मिठी मारायची. लाेक अनेकदा मधला विचित्र पर्याय निवडतात, किंचित वाकणे, अर्धा हात पुढे करणे. जर समाेरच्या व्य्नतीने वेगळा संकेत दिला, तर वातावरण विचित्र हाेते. त्यामुळे अभिवादन करणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण वाटते.
परिस्थितीनुसार याेग्य पर्याय निवडा तज्ज्ञांच्या मते, निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे सुमारे चार सेकंद असतात. हा वेळ संकेत समजून घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी असताे.
त्यानंतर, परिस्थितीनुसार याेग्य पर्याय निवडा. गरज पडल्यास, समाेरच्या व्य्नतीला पुढाकार घेऊ द्या.
संवाद साधताना डाेळ्यांवरून अंदाज घ्या कम्युनिकेशन, काेलंबिया युनिव्हर्सिटीतील प्रशिक्षक जेसिका गाेल्डबर्ग यांनी सांगितले की, यासाठी देहबाेली तज्ज्ञ असणे आवश्यक नाही.
4 सेकंदात 4 गाेष्टी पाहा. त्यात पहिले असतात ते डाेळे. समाेरच्याची नजर प्रेमळ आहे का? ते तुमच्याकडे पाहात आहेत की, त्यांची नजर खाेलीभर इकडे-तिकडे फिरत आहे, ती व्यक्ती खूप मर्यादित दृष्टिकाेन ठेवत आहे असे वाटते का?
समाेरच्या व्य्नतीच्या पायांची, शरीराची दिशाही महत्त्वाची संवाद साधताना समाेरच्या व्य्नतीच्या पायांची आणि शरीराची दिशाही महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती थेट तुमच्या दिशेने येत आहे. पाय तुमच्याकडे असणे म्हणजे ते बाेलण्यासाठी तयार आहेत. ते कदाचित उत्साहीही असू शकतात. जर त्यांचे धड किंवा पाय विरुद्ध दिशेला झुकलेले असतील, तर त्यांचे मन विचलित असेल किंवा त्यांच्यामध्ये संकाेच असेल. जरी ते हसले तरी, हा संकेत महत्त्वाचा आहे.
हातांची स्थिती लक्षात घ्या समाेरच्या व्य्नतीचे उघडे हात आणि पसरलेले बाहू हे मिठी मारण्याचे संकेत आहेत.
बंद बाहू, हातात लॅपटाॅप किंवा पेय धरणे, किंवा आधीच हात पुढे करणे हे हस्तांदाेलन दर्शवते.
चालण्याची गती व्य्नतीच्या चालण्याची गतीही महत्त्वाची असते. जलद, उत्साही पावले अधिक याेग्य वाटतात. हळू, माेजूनमापून चालणे संकाेच दर्शवू शकते. हे संकेत पाहूनही जर तुम्ही ठरवू शकत नसाल, तर एक सुरक्षित उपाय आहे, पुढाकार घेऊ नका.