चाणक्यनीती

    20-Jul-2026
Total Views |
chanakya 
 
4. मालक आणि नाेकर ः मालक-सेवक चर्चा करत असताना त्यात मध्ये पडू नये. तसेच इतरांनी मध्ये येऊन त्याला दुसरी कामे सांगू नयेत किंवा त्याची स्वामीनिष्ठा ढळेल असे वागू नये.
 
5. नांगर आणि बैल ः बैल जाेडून शेतात नांगरणी केली जाते. इतर काेणी मध्ये-मध्ये केल्यास बैल आपले काम नेटाने करू शकणार नाही, कार्य पूर्ण हाेणार नाही, तसेच नांगर लागून इजाही पाेहाेचू शकते.
 
बाेध : काही जाेड्या अशा आहेत की, ज्याने कार्यपूर्ती हाेते. त्यांच्यामध्ये येणे म्हणजे कार्यात विघ्न आणणेच हाेय. असे करण्यात काेणतेही शहाणपण नाही.
 
त्यामुळेच चाण्नयांनी मार्गक्रमाचे, वर्तनाचे दिलेले संकेत नेहमीच पाळावेत.