सदा देवकाजी झिजे देह ज्याचा। जगी धन्य ताे दास सर्वाेत्तमाचा ।।1।।

    18-Jul-2026
Total Views |

saint 
बरं एखादे संकट आले, तर दराेडेखाेर हातपाय माेडून टाकतात, उंदीर, कुत्री, मांजरे, साप, दंश करतात. जंगलात गेलाे तर वाघ, सिंह खाऊन टाकतात किंवा हत्ती पायदळी तुडवू शकतात. तेव्हा खरंतर हा सर्वच समास मुळातून संपूर्ण वाचावयास हवा. श्रीसमर्थांच्या चाैरस ज्ञानाचा, विलक्षण निरीक्षणाचा आपणास त्यात ठायीठायी प्रत्यय येताे. तेव्हा इतका सगळ्यांचा असणारा देह आपण माझा देह ‘असे कसे बरे म्हणू शकताे?’ अस सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, जसे माझे घर माझे नसते, तसेच माझा देह ‘माझा’ नसताे. ताे इतका सगळ्यांचा असताे. ताे या सगळ्यांचे आणि शेवटी मृत्यूचे भक्ष्य आहे. त्यामुळे त्याला ‘माझा’ म्हणणे मूर्खपणाचे आहे.
 
हे जाणून आपण परमार्थमार्गाला देह लावला तरच नरदेहाचे सार्थक हाेईल, नाहीतर मनुष्यजन्म मृत्युपंथाने जाऊन व्यर्थ जाईल आणि माेक्षप्राप्तीऐवजी जन्ममरणाच्या ेऱ्यातच पुन्हा अडकून पडावे लागेल. म्हणून परमार्थ आणि पराेपकार यासाठी देह झिजवून मनुष्यजन्माचे सार्थक करावे असा त्यांचा आग्रह आहे.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299