संध्यानंद.काॅम दाेन दिवसांपूर्वी, जांगामी नावाच्या चक्रीवादळाने जपानमधील अनेक शहरांना तडाखा दिला. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या शहरांमध्ये पूर आला. अनेक लाेक जखमी झाले आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतले. तथापि, या सगळ्यात एक गाेष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे जपानमधील अनेक शहरांमध्ये जेव्हा पुराचे पाणी आले, तेव्हा रस्त्यांवरील पाणी इतके स्वच्छ हाेते की जणू काही आपण स्विमिंग पूलमध्येच अंघाेळ करत आहाेत असे वाटत हाेते.
जपानी लाेकांनी पुराच्या काळात आलेल्या अडचणींचे वर्णन करणारे व्हिडिओ पाेस्ट केले आणि काचेसारखे स्वच्छ पाणी पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. येथील रस्ते इतके स्वच्छ आहेत की पुराचे पाणी भरले तरी ते घाण हाेत नाहीत, ते इतके स्वच्छ असतात की जणू काही आपण स्विमिंग पूलमध्येच अंघाेळ करत आहाेत असे वाटते.