उतारवयात स्नायू घटणे व सांधे जाम हाेणे एक सामान्य समस्या आहे, पण बर्मिंगहम विद्यापीठ व किंग्ज काॅलेज लंडनच्या रिसर्चमध्ये आढळून आले आहे की, जे ज्येष्ठ 20 ते 30 मिनिटे नियमित सायकल चालवतात, त्यांची इम्यून सिस्टीम व स्नायू विशीतील तरुणासारखे मजबूत आढळतात.
अर्थात सायकल उतारवय मागे ढकलण्याची सर्वांत स्वस्त व वैज्ञानिक पद्धत आहे, पण हे लक्षात ठेवा की, आपण एखाद्या आजाराचा सामना करीत असाल तर डाॅ्नटरांच्या सल्ल्यानेच सायकल चालवा.
वृद्धांच्या सुरक्षेसाठी दाेन नियम
सायकल सेटअप : सीटची लेव्हल पॅडल खाली असल्यानंतरही पाय थाेडासा वाकडा राहील अशी ठेवा.
यामुळे पाठीच्या कण्यावर दबाव येणार नाही.
इंडाेर पर्याय : बाहेर तीव्र ऊन वा ट्रॅफिक असेलतर घरात स्टेशनरी वा मॅग्नेटिक ए्नसरसाइज सायकल सर्वांत सुरक्षित पर्याय आहे.
नियमित सायकल चालवल्यामुळे हाेणारे 3 माेठे फायदे गुडघे मजबूत राहतील : सायकलचे पॅडल मारल्यामुळे सांध्यांमध्ये ‘सायनाेव्हियल फ्लूइड’ अर्थात नॅचरल ग्रीसचा स्राव वाढताे. यामुळे गुडघ्यांसाठी फायदा असताे.
स्मरणशक्ती वाढेल : प्राेसिडिंग ऑफ नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्समध्ये छापलेल्या रिसर्च सांगताे की, विस्मरणाशी झुंजणाऱ्या वृद्घांसाठी सायकल चालवणे मेंदूचे टाॅनिक आहे.
हृदय-फुफ्फुसे सुदृढ राहतील : सायकलिंगसारखा एराेबिक ए्नसरसाइज मेटाबाॅलिज्म आणि सूजेसारखा मार्कर्समध्ये सुधारणा आणताे. हा हृदयराेग व शुगरची जाेखिम कमी करताे.