नागपूर, 14 जुलै (आ.प्र.) : तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत सदस्य देशांमध्ये शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्था विकसित करण्याबाबत व्यापक चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हाेते. या बैठकीत वाहतूक क्षेत्रातील सहकार्य आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
इजिप्तचे उपपंतप्रधान तथा उद्याेग व परिवहन मंत्री कामेल अल-वझीर, संयु्नत अरब अमिरातीचे (यूएई) अर्थमंत्री अब्दुल्ला बिन ताैक अल मरी, रशियाचे परिवहन मंत्री राेमन स्टाराेवाेइत, इंडाेनेशियाच्या सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण मंत्रालयाचे सहायक हॅरी ट्रिसापुत्रा जुना, चीनचे परिवहन मंत्री हान जुन, ब्राझीलचे परिवहन मंत्री रेनान फिल्हाे, भारतातील इजिप्तचे राजदूत एच. ई. कामेल जायेद गलाल, इराणचे ऊर्जा मंत्री अली अकबर मेहराबियान; तसेच दक्षिण आफ्रिकेचे उपपरिवहन मंत्री मखुलेकाे हृेंगवा आदी मान्यवर या बैठकीत सहभागी झाले हाेते.
यंदाच्या बैठकीची संकल्पना लवचिकता, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी असून, त्यानुसार सदस्य देशांनी स्वच्छ, सुरक्षित, स्मार्ट आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. हवामान बदलाशी सुसंगत वाहतूक पायाभूत सुविधा उभारणे, हरित तंत्रज्ञानाला प्राेत्साहन देणे आणि भविष्यातील आव्हानांना ताेंड देण्यासाठी सक्षम वाहतूक जाळे निर्माण करण्यावरही चर्चा झाली.
वाहतूक क्षेत्रातील परिवर्तन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा अनुभव भारताने सदस्य देशांसमाेर मांडला.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात माेठे रस्ते जाळे, पंतप्रधान गतिश्नती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, आर्थिक काॅरिडाॅर आणि मल्टीमाेडल कनेक्टिव्हिटी यासारख्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, वंदे भारत रेल्वेचा विस्तार, उच्चगती रेल्वे प्रकल्प आणि उडान याेजनेद्वारे वाहतूक क्षेत्रात झालेल्या सुधारणांचीही माहिती देण्यात आली.
रस्ता सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत बांधकाम साहित्याच्या वापरावर विशेष भर देण्यात आला. रस्ते बांधकामात पुनर्वापरित प्लॅस्टिक, फ्लाय श, स्टील स्लॅग आणि जुन्या टायरींचा वापर यासारख्या शाश्वत विकासाचे प्रभावी माॅडेल म्हणून सादर करण्यात आले. याशिवाय हरित हायड्राेजन, इलेक्ट्रिक माेबिलिटी, पर्यायी इंधन, डिजिटल वाहतूक व्यवस्था, मल्टीमाेडल पायाभूत सुविधा, संयु्नत संशाेधन, तांत्रिक सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या क्षेत्रात सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले. ब्रिक्स देशांमधील भागीदारीमुळे जागतिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शाश्वत आणि जनहिताभिमुख बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, यावरही बैठकीत भर देण्यात आला.