जन्मास कारण मूळ देहबुद्धी। परी ज्ञानसिद्धी देहसंगे ।।१।।

    15-Jul-2026
Total Views |

saint 
मनुष्यजन्माला येऊन नरदेह प्राप्त झाल्यामुळे तत्त्वज्ञानाचा आणि षट्दर्शनाचा अभ्यास करून मानसिक व आत्मि क उन्नयन साध्य करता येते. अशा आध्यात्मिक प्रगतीमुळेच एकेकाळी केवळ सामान्यजन असलेले साधकसुद्धा तपस्वी, याेगाभ्यासी हाेऊन विरक्तीच्या मार्गाने जाऊन सिद्धस्थितीला प्राप्त हाेतात.
 
पशू किंवा पक्ष्यांच्या जन्माला आलाे, तर त्याला बुद्धी तर नसतेच; पण शिवाय स्वातंत्र्यही नसते. गायी, म्हशी, घाेडे, कुत्री, पाेपट या सर्वांना मानवप्राणी वेसण लावून किंवा पिंजऱ्यात घालून अंकित करताे. श्रीसमर्थ तेव्हाच्या काळाप्रमाणे दासींचेही उदाहरण देतात आणि म्हणतात की, परावलंबी स्त्री किंवा दासी हीसुद्धा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही.
 
काेणत्याही संतांच्या विचारांचा मागाेवा घेताना त्या त्या वेळची देशकालमानस्थिती लक्षात घेणे जरूर आहे. विचार न करताच संतांच्यावर प्रतिगामीपणाचा आराेप करण्याचा अनेक तथाकथित विद्वानांना माेह हाेताे.
 
खरं तर श्रीसमर्थ हा विचार सतराव्या शतकात लिहीत आहेत. तेव्हा आर्थिक आणि वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्री ही कल्पनासुद्धा दुर्मीळ हाेती. त्यामुळे येथे स्त्री किंवा दासी असा उल्लेख आलेला आहे. श्रीसमर्थांसारखा विचारवंत मिळणे अशक्य आहे.