कुणी खाऊ नये भेंडी?

    14-Jul-2026
Total Views |
 
ladyfinger
 
लहान मुले असाे वा घरातील माेठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला तर चांगली लागतेच साेबतच याचे आराेग्यालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पाेषक तत्व असतात.
 
जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फाॅस्फाेरस असतात.भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पाेषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे हाेत असले तरी काही लाेकांसाठी भेंडी नुकसान कारक ठरू शकते. असे काही आजार असतात ज्या दरम्यान भेंडी खाणं घातक ठरू शकतं. अशात कुणी भेंडीची भाजी खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहाेत.
एलर्जी असलेल्यांनी : जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पाेटात वेदना अशा समस्या हाेऊ शकतात.
 
पचनासंबंधी समस्या असल्यास : जर तुम्हाला आधीच बद्धकाेष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बाॅवेल सिंड्राेम सारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.
 
डायबिटीस असेल तर : भेंडीमध्ये ब्लड शुगर कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचं औषध घेत असाल तर भेंडी खाण्याआधी एकदा डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
 
किडनी स्टाेन : किडनी स्टाेन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं.
 
ज्यामुळे किडनी स्टाेन हाेण्याचा धाेका अधिक वाढताे. जर तुम्हाला किडनी स्टाेनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये.
गॅस्ट्राेइंटेस्टायनल समस्या : भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लाेकांमध्ये गॅस्ट्राेइंटेस्टायनल समस्या हाेऊ शकतात. जशा की, पाेटात गॅस हाेणे, पाेट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लाेकांनी भेंडी अजिबात खाऊ नये.