नवी मुंबई, 13 जुलै (आ.प्र.) :
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच तिमाहीत 434.02 काेटींचा मालमत्ता कर जमा करून नवी मुंबई महापालिकेने महसूल संकलनाचा नवा विक्रम नाेंदवला.
विशेष म्हणजे यंदा करदात्यांसाठी काेणतीही सवलत, अभय याेजना किंवा व्याजमाफी लागू करण्यात आली नव्हती. तरीही 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तिमाही वसुलीची नाेंद झाली असून, मागील आर्थिक वर्षातील 876 काेटींच्या एकूण वसुलीपैकी जवळपास 50 ट्नके महसूल अवघ्या तीन महिन्यांत जमा झाला आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एवढ्या प्रमाणात मालमत्ता कर संकलित करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महापालिका ठरली. यंदा शहरातील 3 लाख 55 हजार 772 करदात्यांपैकी 1 लाख 43 हजार 329 करदात्यांनी मालमत्ता कर भरला. गेल्या वर्षी याच कालावधीत 98478 करदात्यांकडून 372.42 काेटी जमा झाले हाेते. त्यामुळे यंदा करदात्यांच्या संख्येबराेबरच महसूल संकलनातही लक्षणीय वाढ झाली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर आणि डेटा विश्लेषणावर आधारित नियाेजन या वसुलीत महत्त्वाचे ठरले. अतिर्नित आयु्नत सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायु्नत डाॅ. अमाेल पालवे यांच्या अधिपत्याखाली मालमत्ता कर विभागाने थकीत कर, करदात्यांच्या भरणा पद्धती, विभागनिहाय वसुली आणि महसूल संकलनातील संधींचे विश्लेषण करून व्यवस्थापन अहवालांच्या माध्यमातून वसुली प्रक्रियेवर देखरेख ठेवली. त्यातून मागील वर्षी किंवा त्यापूर्वी कर न भरलेल्या 15250 मालमत्ताधारकांकडून 23.67 काेटींची वसुली करण्यात आली; तसेच मागील वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चाैथ्या तिमाहीत कर भरणाऱ्या 1 लाख 23 हजार 323 करदात्यांपैकी 56973 करदात्यांनी यंदा पहिल्याच तिमाहीत 165.74 काेटींहून अधिक कर भरल्याने वेळेत कर भरण्याचे प्रमाण वाढल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
एकूण कर संकलनापैकी 1 लाख 3 हजार 473 करदात्यांनी 280.71 काेटी (72.2 ट्नके) ऑनलाइन भरले. 2703 करदात्यांनी 8.36 काेटी रुपये ऑफलाइन, तर 12833 करदात्यांकडून 144.93 काेटी रुपये बँक व्यवहारांद्वारे जमा झाले. एसएमएस आणि व्हाॅट्सअॅपद्वारे पाठवण्यात आलेल्या पेमेंट लिंकच्या माध्यमातून 57397 करदात्यांनी सुमारे 58 काेटींचा कर भरला.
विभागनिहाय वसुलीत घणसाेली विभागातून सर्वाधिक 80 काेटींचा कर जमा झाला. औद्याेगिक मालमत्तांचा महसुलातील वाटा 35.79 ट्नके, निवासी 31.92 ट्नके, व्यावसायिक 22.26 ट्नके, तर मिश्र व इतर मालमत्तांचा 10.03 ट्नके आहे.