धन्य धन्य हा नरदेहाे । येथील अपूर्वता पाहाे ।।2।।

    14-Jul-2026
Total Views |

saint 
या नरदेहामुळेच आपण भक्ती करू शकताे. जपतप, तीर्थाटन, पुरश्चरण, नामस्मरण, हरिकीर्तन, याेगाभ्यास, वेदाध्ययन, ग्रंथपठण हे सर्व साधनमार्ग आपण मनुष्यजन्माला आल्यामुळेच क्रमू शकताे.
 
ही सर्व अपूर्व अशी उपलब्धी आपणाला नरदेहामुळे प्राप्त हाेते. ती सत्कारणी लावून, साधनमार्ग चाेखाळून आपण आपली उन्नती करून घेऊ शकताे. त्यामुळे काेणी याेगी, तापसी, विरागी, वीतरागी, साधक आकाशासारखे विशाल सिद्ध हाेऊ शकतात. अनेकांना अदृश्य हाेणे, भविष्य जाणणे, पाण्यावरून किंवा हवेतून प्रवास करणे, पशुपक्ष्यांवर सत्ता गाजविणे, वाचासिद्धी, जलसिद्धी, वायुसिद्धी अशा तऱ्हेच्या अनेक सिद्धी प्राप्त करून घेता येतात. मात्र या सिद्धी म्हणजे परब्रह्म नव्हे हेही लक्षात ठेवले पाहिजे, असे बजावल्यावाचून श्रीसमर्थ राहात नाहीत.
 
या नरदेहाचे आधाराने मनुष्यजन्माचे सत्य सार्थक करून घ्यावयाचे असेल तर अनेकविध साधनांनी भक्ती करून, सारासार विचाराने खरे सत्य काय हे जाणून जन्ममरणाच्या ेऱ्यातून मुक्त हाेणे आवश्यक आहे आणि ते नरदेहाच्या आधारेच देहाचे आणि देहाेपभाेगांचे ममत्व आणि अभिमान साेडून, अंतरातील आनंद जाणून घेऊन साध्य केले तर निश्चितपणे माणूस उत्तम गतीला प्राप्त हाेऊन स्वानंदसुखाचा अधिकारी हाेताे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299