विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आकलनश्नती हवी

    14-Jul-2026
Total Views |
  
professors-on-what-makes-a-good-student
संध्यानंद.काॅम हार्वर्ड विद्यापीठाने आपल्या प्राध्यापकांना आणि व्याख्यात्यांना विचारले की, एक चांगला विद्यार्थी कशामुळे बनताे? त्यांच्यामध्ये काेणते गुण असले पाहिजेत? प्राध्यापकांनी जिज्ञासा, अचूक विचार, नीतिमत्ता आणि आकलनशक्ती या गुणांना महत्त्व दिले. हार्वर्डने ही उत्तरे देखील प्रकाशित केली आहेत. त्यात चार प्रमुख गुणांचा उल्लेख आहे, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे खरी, सखाेल आणि सातत्यपूर्ण जिज्ञासा. दुसरा म्हणजे अचूक विचार. तिसरा म्हणजे नीतिमत्ता, म्हणजेच ते काेणत्याही अयाेग्य पद्धती टाळतात.चाैथा आणि शेवटचा म्हणजे एखादे काम केव्हा सुरू करावे आणि केव्हा संपवावे हे जाणून घेणे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विषयानुसार किंवा क्षेत्रानुसार काही विशिष्ट गुण आवश्यक असतात, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.
 
विज्ञानातील विद्यार्थ्यांचे गुण सांगताना प्रा. काेरा आयवर्किन यांनी सांगितले की, जे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी अभ्यास करतात.
 
त्यांना काेणत्याही बाह्य प्राेत्साहनाची गरज नाही.
 
 शाेध लावण्याची उत्कट प्रेरणा : प्रा. टीना ग्राेट्झर यांनी सांगितले की, चांगले विद्यार्थी शाळेच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि चांगली कमाई करतात. पण ‘उत्तम शिकणारे’ हे शाेध लावण्याच्या उत्कटतेने प्रेरित असतात.

विचारण्यासाठी नेहमीच अधिक प्रश्न असतात : प्रा. केनेथ डब्ल्यू. मैक यांच्या मते, कायद्याच्या अभ्यासातील चांगले विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि विचारतच राहतात! त्यांना हे समजते की, आपल्याला कितीही माहिती असली तरी, विचारण्यासाठी नेहमीच अधिक प्रश्न असतात. चांगले विद्यार्थी मतभेद गांभीर्याने घेतात. ते काळजीपूर्वक ऐकतात, इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि विचारपूर्वक प्रतिसाद देतात, असे प्रा. हुआ वांग यांनी सांगितले.का करायचे हे देखील माहीत असणे महत्त्वाचे : वैद्यकीय विद्यार्थ्यांचे गुण सांगताना रिचर्ड एम.

श्वार्ट्झस्टाईन यांनी सांगितले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांना, काय करायचे हे माहीत असणे पुरेसे नाही, तर ते का करायचे हे देखील माहीत असणे महत्त्वाचे आहे.

इतरांना पटवून देण्यात पारंगत : जे विद्यार्थी स्पष्ट युक्तिवाद आणि निष्कर्षांसह कल्पना मांडू शकतात, त्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजताे आणि ते इतरांना पटवून देण्यात पारंगत असतात, असे मत प्रा. देहिया उमुन्ना यांनी व्यक्त केले.

तीव्र एकाग्रता आवश्यक : डिझाइनमधील विद्यार्थ्यांबद्दल प्रा.मेगन पॅनझानाे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना यशासाठी तीव्र एकाग्रता आणि जगाकडे सखाेलपणे पाहण्याची इच्छा आवश्यक असते. हीच गाेष्ट त्यांना पुढे नेते. प्रा. जेकब बारंडेस यांनी सांगितले की, आपले काम कधी थांबवावे, कुठल्या पाॅइंटला ते पुरेसे आहे, हे कळणे महत्त्वाचे आहे. एक प्रकल्प कधी संपवायचा आणि पुढच्या प्रकल्पाकडे कधी वळायचे, हे समजणे हे एक महत्त्वाचे काैशल्य आहे.

सतत कुतूहल असते : हेनरीक सी. बेशे यांनी सांगितले की, चांगले विद्यार्थी स्वतः उच्च नैतिक मूल्यांचे पालन करतात. ते स्वतःसाठी उच्च मापदंड ठेवतात, आपले सर्व काम पूर्ण प्रामाणिकपणाने करतात आणि आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करतात. ते फसवणूक करत नाहीत किंवा शाॅर्टकट घेत नाहीत.
त्यांच्यामध्ये सतत कुतूहल असते.