इ-कचरा माैल्यवान आणि जीवघेणा ठरताे आह

    14-Jul-2026
Total Views |
 
ewaste-crisis-growing-electronic
 
संध्यानंद.काॅम इ-कचरा म्हणजे काेणतेही इलेक्ट्राॅनिक किंवा इलेक्ट्रिकल उपकरण ज्याचा वापर पूर्ण झाला आहे, ते खराब झाले आहे वा त्याला फेकून देण्यात आले आहे.
 
त्यामध्ये माेबाईल फाेन, काॅम्प्युटर, टॅब्लेट, टीव्ही, फ्रिज, वाॅशिंग मशीन, बॅटरी, वायर, चार्जर इत्यादींचा समावेश हाेताे.
काेटी टनांमध्ये वाढताेय इ-कचरा माेबाईल फाेनचा वाढता वापर, जलद डिजिटायझेशन, इलेक्ट्राॅनिक उपकरणांचे घटते आयुष्य आणि वाढती खरेदीशक्ती यामुळे इ-वेस्टचे प्रमाण वाढत आहे.
 
संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक इ-कचरा माॅनिटरच्या अहवालानुसार, जगात दर वर्षी अंदाजे 60 दशलक्ष टनांहून अधिक इ-वेस्ट निर्माण हाेते. हा आकडा सतत वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील दशकात हे प्रमाण 80 दशलक्ष टनांहून अधिक हाेऊ शकते. आपल्या देशात दर वर्षी अंदाजे 35 ते 40 लाख टन इतका इ-वेस्ट निर्माण हाेताे.
 
इ-कचऱ्यातून वाढतेय प्रदूषण जगातील एकूण इ-वेस्टपैकी फक्त एक छाेटा हिस्साच वैज्ञानिकदृष्ट्या रिसायकल हाेताे, ही चिंताजनक बाब आहे. उरलेला कचरा जमिनीत जाताे किंवा अनियंत्रितपणे जाळून टाकला जाताे. या उपकरणांमध्ये शिसे, पारा, कॅडमियम यांसारखे विषारी धातूसुद्धा असतात.
 
त्यांची याेग्य विल्हेवाट न लावल्यास जमीन, पाणी आणि हवेत प्रदूषण पसरते. त्याचा मानवी आराेग्यावर गंभीर परिणाम हाेऊ शकताे.

उपकरणांमध्ये असतात माैल्यवान धातू ः अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, जुने माेबाईल आणि काॅम्प्युटर फक्त कचरा नाहीत.

त्यामध्ये माैल्यवान धातू असतात. एक टन माेबाईल म्हणजे 6 हजार स्मार्ट फाेन्समधून साेने, चांदी, तांबे, पॅलेडियम, अ‍ॅल्युमिनियम मिळू शकते. या कारणामुळे ई-वेस्टला अनेकदा शहरी खाणसुद्धा म्हटले जाते.

इ-कचऱ्यातील साेने ः उत्तम वीजवाहक, सहजपणे गंज न चढणे यामुळे इलेक्ट्राॅनिक्समध्ये साेन्याचा वापर हाेताे. माेबाईल, काॅम्प्युटर मदरबाेर्ड, सर्व्हर, गेमिंग कन्साेल, टेलिकाॅम साधने विशेषतः सर्किट बाेर्डच्या कनेक्टर्स-चिप्समध्ये साेन्याचा पातळ थर असताे.

प्रत्येक उपकरणात फक्त मिलिग्राम किंवा त्याहून कमी साेने असते. परंतु जेव्हा लाखाे जुने माेबाईल, काॅम्प्युटर, सर्व्हरचे सर्किट बाेर्ड एकत्र केले जातात, तेव्हा एकूण मिळून माेठ्या प्रमाणात साेने मिळू शकते. उपकरणातून साेने काढण्याची ही प्रक्रिया औद्याेगिक स्तरावर विशेष मशिन्स आणि रसायनांद्वारेच सुरक्षितपणे हाेते. काही वेळा इ-वेस्ट मधून मिळणारे साेने हे पारंपरिक खाणींतून मिळणाऱ्या साेन्यापेक्षा अधिक प्रमाणात असते.