पालख्यांसाेबत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे वैद्यकीय सेवा

    14-Jul-2026
Total Views |

dagadusheth-trust 
पुणे, 13 जुलै (आ.प्र.) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत साेपानकाकांच्या पालखी साेहळ्यासाेबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तीन सुसज्ज रुग्णवाहिका श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पुण्यातून रवाना झाल्या; तसेच वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून, माेठ्या प्रमाणात डाॅक्टर्स, औषधे व आराेग्यविषयक सेवा पालखी साेहळा समाराेपापर्यंत विनामूल्य पुरवण्यात येणार आहेत.
 
गणपती मंदिरासमाेर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियाेजन करणारे डाॅ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. उपक्रमाचे यंदा 37 वे वर्ष आहे. डाॅ. परांजपे म्हणाले, की कित्येक किमीचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आराेग्याची काळजी घेत आवश्यक आराेग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले जाते. सासवडमार्गे जाणाऱ्या माऊलींच्या पालखीसाेबत लाेणीमार्गे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाेबत आणि संत साेपानकाका पालखी साेहळ्यासाेबत या रुग्णवाहिका असणार आहेत. दगडूशेठ ट्रस्ट आणि सहयाेगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी साेहळा मु्नकामाच्या ठिकाणी फिरता दवाखाना चालवला जाताे. यात त्वचाराेग, कान-नाक-घसा, नेत्र तपासणी, र्नतदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.