1. शांतवृत्ती - व्य्नती आपल्या प्राप्त परिस्थितीत, क्षमतेनुसार जे मिळते त्यात समाधान मानत असेल तर त्याला मन:शांती मिळते. कारण समाधान ही अमृताप्रमाणे तृप्त करणारी वृत्ती आहे.अशी वृत्तीच माणसाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून देते.
2. अशांतवृत्ती - धनाची हाव धरणाऱ्या व्य्नती सतत एक नाेकरी साेडून दुसरी, तिसरी नाेकरी धरतात.
पैशामागे धावत सुटतात. मात्र ते नेहमीच असंतुष्ट, अशांत, अस्वस्थ असतात. माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे. हे साध्य नसून केवळ एक साधन आहे, हे ते विसरतात. अशा लाेकांनी ‘सुख, जी मनाची केवळ एक अवस्था आहे’ त्याला मुकतात.
कारण महालातील राजापेक्षा झाेपडीत राहून मीठभाकर खाणाऱ्या व्य्नती या सुखी-समाधानी असतात.
बाेध : समाधानीवृत्तीतच सुख सामावलेले आहे.