काळी मिरी ही अनेक बाबतीत औषधी आहे. लाल मिरचीच्या तुलनेत ती कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरचीऐवजी काळ्या मिरीचा उपयाेग केला जाताे. काळ्या मिरीचा याेग्य पद्धतीने उपयाेग केला तर ती रासायनिक गुणसुद्धा देते.
आयुर्वेदात सर्वप्रकारचे जीवाणू, विषाणू इत्यादींचा नाश करणारी औषधी म्हणून काळी मिरी ओळखली जाते. मिरीमुळे खाण्याचा स्वाद वाढताेच, पण त्याचबराेबर तिच्या सेवनाने पाेटातील हायड्राेक्लाेरिक अॅसिड वेगाने वाढते आणि पचन याेग्य प्रकारे हाेते. मिरीमध्ये अनेक प्रकारचे अँटिबॅक्टेरिया असतात. ते आतड्यामध्ये हाेणारा संसर्ग बरा करतात. या व्यतिरिक्त अनेक त्रासांवर काळी मिरी गुणकारी ठरते.
तिचा वापर काेणत्या त्रासासाठी कशा प्रकारे करायचा हे जाणून घेऊ.
सर्दीमुळे घसा खराब असेल तर काळ्या मिरीचा काढा फायदेशीर ठरताे.
सर्दी झाल्यानंतर गरम दुधात काळी मिरी पूड टाकून हे दूध प्यावे. तसेच वारंवार सर्दी हाेत असेल, शिंका येत असतील तर एका मिरीपासून सुरुवात करून राेज एक मिरी वाढवत न्यायची 15 दिवसांपर्यंत असे करून पुन्हा एक-एक मिरी पुढचे 15 दिवस कमी करत जायचे अशा प्रकारे मिरी घेतल्यास वारंवार हाेणारी सर्दी एका महिन्यात समाप्त हाेते.
घसा बसणे : काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास बंद गळा माेकळा हाेताे आणि आवाज देखील चांगला हाेताे. 8-10 काळे मिरे पाण्यात उकळून या पाण्याद्वारे गुळण्या कराव्यात.
यामुळे गळ्याला झालेला संसर्ग नाहीसा हाेताे.
त्वचा राेग : काळी मिरी तुपात बारीक करून त्याचा लेप करावा. हा लेप त्वचेचा संसर्ग, फाेड, मुरूम इत्यादींवर लावावा.
सर्दी, पडसे, खाेकला झाल्यास 8-10 काळे मिरे, 10-15 तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा, आराम मिळताे.4-5 काळे मिरे आणि साेबत 15 बेदाणे एकत्र खाल्ल्यास खाेकला बरा हाेताे. 100 ग्रॅम गूळ विरघळवून त्यात 20 ग्रॅम काळ्या मिरीची पावडर मिसळावी.
थाेडे थंड झाल्यानंतर त्याच्या छाेट्याछाेट्या गाेळ्या बनवाव्या. जेवल्यानंतर 2-2 गाेळ्या खाल्ल्यास खाेकल्यासाठी आराम मिळताे. खाेकला झाल्यास अर्धा चमचा काळ्या मिरीचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे चाटण दिवसातून 3-4 वेळा चाटावे. खाेकला दूर हाेताे.
काळी मिरी दातांचे आणि हिरड्यांच्या वेदना दूर करते. त्यासाठी काळ्या मिरीसाेबत मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी ती पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर लावावी.
वेदना कमी हाेतात.
ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे.
त्यांच्यासाठीही काळी मिरी उपयाेगाची ठरते.
कारण मिरीमध्ये असे काही घटक आहेत, जे वजन वाढविणार्या पेशी कमी करतात.
काेरडा खाेकला झाला असल्यास 15-20 ग्रॅम शुद्ध तूप घेऊन त्यात 4-5 काळे मिरे टाकावेत आणि ते गरम करावेत.
काळी मिरी कडकडून वर येईल. तेव्हा भांडे गॅसवरून खाली उतरवावे. नंतर यामध्ये 20 ग्रॅम पिठीसाखर घालावी. काळी मिरी चावून खावून टाकावी. एक तासापर्यंत काही खाऊ नये. ही क्रिया दाेन-तीन दिवस करावी.