माणूस हाेण्याचे सत्य जाणा‘

    08-Jun-2026
Total Views |
 
 

truth 
माेठी स्वप्ने पाहायला हवीत आणि ती पूर्णही करायला हवीत’ असे व्यवस्थापनाच्या भाषेत समजावले जाते, पण अध्यात्म येथे थाेडे वेगळे सांगत म्हणते, ‘स्वप्न ना माेठे असते ना छाेटे. ना खरे असते ना खाेटे, पण तरीही पडत असतात आणि जर खाेटी असतील तर पडतात का? खरे तर यात खरा आहे ताे स्वप्न पाहणारा. जी व्य्नती स्वप्न पाहात असते ती सत्य आहे. स्वप्न सत्य नाही. आपण आपले माणूस हाेण्याचे सत्य जेवढे जास्त जाणाल त्यालाच म्हणाल स्वप्न पूर्ण करणे.यासाठी असे सांगितले जाते की, स्वप्ने अवश्य पहा जेणेकरून ती पूर्ण करण्यासाठी पुरुषार्थ करू शकू. पुरुषार्थाला प्रेरित करण्यासाठी एक असे खाेटे जे खऱ्यासारखे असते पण खरे नसते. त्यांनी मनुष्याला जाेडले जाते.माणसाला नेहमी काही ना काही हवे असते. त्याचे मन सतत काही ना काहमागत असते. त्यामुळे त्याला स्वप्नांमध्ये वावरणे खूप साेयीस्कर हाेते. जर यश मि ळाले तर सारे जग प्रशंसा करते. आम्हा लाेकांना परिणामांची प्रशंसा करण्याची सवय लागली आहे. हा प्रयाेग मुलांबाबत अजिबात करू नये. लक्षात ठेवा. प्रशंसा करावयाची असेल तर प्रयत्नांची करा, परिणामाची नाही. कारण मुले स्वप्ने पाहात नाहीत तर स्वप्नांच्या जगात वावरत असतात. जर त्यांना परिणामांशी जाेडले तर ते आणि त्यांची स्वप्ने दाेन्ही तुटून जातील.