सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकाेन झपाट्याने बदलत आहेत. एकेकाळी याला जीवनाचा ‘शेवटचा टप्पा’ मानत. पण आता ते जीवनाचा ‘दुसरा डाव’ बनत आहे. संशाेधन आणि आकडेवारी दाखवते की, अनेक लाेक केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्याही सेवानिवृत्तीसाठी तयार आहेत. 50% शहरी भारतीय सेवानिवृत्तीनंतर मुलांवर अवलंबून नाहीत.गुंतवणुकीद्वारे मजबूत आर्थिक तयारी सेवानिवृत्ती निर्देशांक 5 वर्षांत 44 वरून 48 पर्यंत वाढला आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि क्वांटासच्या इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी ((IRIS 5.0)) नुसार, शहरी भारतातील सेवानिवृत्ती तयारी निर्दे शांक 2021 मध्ये 100 पैकी 44 वरून 2025 च्या अखेरीस 48 पर्यंत वाढला आहे. हे अधिक चांगल्या, अधिक सावध तयारीचे द्याेतक आहे. काॅर्पाेरेट वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट गिरीश साेदानी म्हणतात, पूर्वी, सेवानिवृत्ती निधी म्हणजे पीएफ, ग्रॅच्युइटी, काही बचत असायच्या.
पण आता लाेक म्युच्युअल फंड, रिटायरमेंट प्लॅन, एनपीएस, इक्विटी, रिअल इस्टेट यांसारखे विविध गुंतवणुकीचे पर्याय स्वीकारत आहेत.इंटरनॅशनल जर्नल फाॅर रिसर्च ट्रेंड्स अँड इनाेव्हेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात, 48.9% लाेकांनी सांगितले की, सेवानिवृत्तीच्यानियाेजनात आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे. 72.3% लाेक सेवानिवृत्ती निधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. 57.49% लाेक ईपीएफवर अवलंबून आहेत. 65% लाेक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आराेग्य विमा घेत आहेत.सक्रिय सेवानिवृत्ती जीवन, आराम नव्हे सेवानिवृत्ती ही आता विश्रांतीची वेळ नसून, सक्रिय जीवनाची वेळ आहे. फिटनेस तज्ज्ञ विशाल वर्मा म्हणतात, लाेक 40-50 वर्षांच्या वयापासून फिटनेस, आहार, याेग आणि आराेग्य तपासणीवर लक्ष केंद्रित करत आहेत.छाेटे कुटुंब, मुलांचे घराबाहेर स्थायिक हाेणे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली आधार व्यवस्था कमी झाली आहे.
त्यांना वृद्धापकाळात तंदुरुस्त राहायचे आहे. ‘वर्ल्ड जर्नल ऑफ बायाेलाॅजी, फार्मसी अँड हेल्थ’ (विस्डम) मध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वे क्षणानुसार, भारतातील 60-69 वयाेगटातील 96% लाेकांनी व्यायाम, जिमसारखे उपक्रम स्वीकारण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या इनिंगसाठी मानसिक तयारी लाेक त्यांच्या दुसऱ्या इनिंगसाठी मानसिक तयारी करत आहेत. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ काकाेली राॅय यांच्या मते, सेवानिवृत्तीपूर्वी सल्ला घेणाऱ्या लाेकांची संख्या वाढत आहे. पूर्वी, सेवानिवृत्तीनंतर रिकामपणाची आणि मुला-मुलींवर, नातेवाइकांवर अवलंबून राहण्याची भीती हाेती. आता, लाेक मानसिक तयारी करत आहेत. सेवानिवृत्ती समुदाय स्थापन केले जात आहेत.नवीन काैशल्ये शिकणे, अर्धवेळ काम किंवा बॅले करणे सामान्य झाले आहे.
पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि अनुकूल वातावरण सुधारित पायाभूत सुविधा, आराेग्यसेवा, ज्येष्ठांसाठी अनुकूल निवासव्यवस्था आणि डिजिटल सेवांमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत सहायक वातावरण निर्माण झाले आहे. बँकिंग, गुंतवणूक आणि आराेग्य सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आणि सहज उपलब्ध आहेत. ट्रॅव्हल एजन्सी, रिटायरमेंट कम्युनिटीज आणि सिनियर क्लब या वयाेगटासाठी विशेष सेवा देत आहेत तीर्थयात्रेची जागा आता अनुभवात्मक प्रवास घेत आहे एके काळी सेवानिवृत्तीनंतर तीर्थयात्रा हा प्रमुख पर्याय हाेता, तर आता अनुभवात्मक प्रवास हे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. ग्रँड ब्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, देशातील ज्येष्ठ नागरिकांची पर्यटन बाजारपेठ वार्षिक 18.2% दराने वाढत आहे. इंडिया आउटबाउंडच्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ प्रवास, वेलनेस रिट्रीट्स आणि साहसी सहलींमध्ये रस वाढला आहे.