मी मेल्यानंतर आपण माझे मित्र एक-एक दाेन-दाेन पैसे करून सहा आणे गाेळा करा अन् त्याला देऊन टाका. माझ्यावर एकदम माेठा भार शिल्लक रहायला नकाे. एकाचेच सहा आणे हे ओझं मला जरा जास्त हाेईल.तुम्हा सर्वांचा भार एक एक पैशाचा राहील. कुठल्या रस्त्यावर, या मार्गावर जर या अनंतयात्रेत कधी गाठ पडली तर तेव्हा मी ती परतफेड करून टाकीन. बस्स एवढेच, बाकी सगळे मिटवलेले आहे.’ आपण मरताना किती आण्यांच्या ओझ्याने दबले जाल? हिशेब करणे माेठे कठीण आहे, नाही का? किती अडकून राहील. काही हिशेब करता येईल का? एखाद्याला शिवी दिली हाेती पण माफी मागायची राहिली.काेणावर रागावलाे हाेताे. पण, क्षमा मागू शकला नव्हतात.
कुणावर तरी प्रेम करण्याचं सांगितले हाेते पण प्रेम करू शकला नव्हतात. कुणाची सेवा करायचे आश्वासन दिले हाेते पण सेवा काही करता आली नाही. असे सगळे अर्धे-मुर्धे अडकून राहिले आहे. सर्व बाजूंनी हे अर्धवट, अडकलेलेच, आपणास नव्या जन्मात घेऊन जाते.ही असम्यक कर्मेच आपणास परत नव्य कर्मात घेऊन जातात. अन् मागच्या जन्माचेही कर्म पुरे हाेत नाही.या जन्माचेही पुरे हाेत नाही. उलट भार वाढत जाताे.मग हलके नाही हाेणार कधी. कर्मसिद्धांत, कर्मविचार यांच्यामागे जाे आधार आहे ताे हाच जी व्यक्ती सर्व कर्मे संयत राहून पूर्ण करून घेते, ती त्या कर्माच्या बाहेर निघून जाते, मग तिचा मृत्यू हाेऊ शकत नाही. तिचा मग माेक्षच आहे. कारण परतण्यासाठी काहीच कारण नसते.यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते। नि:स्पृह सर्वकामेभ्याे युक्त इत्युच्यते तदा ।।18।।