आरक्षित भूखंडांवर राहणार ऑनलाइन नजर

    08-Jun-2026
Total Views |
 
 

online 
 
कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या विविध साेयी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचा पूर्ण विकास करता यावा. या आरक्षित भूखंडांवर काेणत्याही प्रकारची बेकायदा बांधकामे आणि बेकायदा बाजार आदी हाेऊ नयेत म्हणून पालिका प्रशासनाने या आरक्षित भूखंडांची भाैगाेलिक माहिती प्रणालीतून (जीआयएस) माहिती जमा करून ऑनलाईन माध्यमातून या भूखंडांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका हद्दीतील राखीव भूखंड भूमाफिया आणि इतर समाजकंटकांच्या तावडीतून मुक्त ठेवण्यासाठी आयुक्त अभिनव गाेयल यांनी कठाेर पाऊल उचलले आहे. प ा ि ल क े ल ा विकास हक्क हस्तांतर, सर्व समावेशक आरक्षण आणि विविध माध्यमांतून भूखंड उपलब्ध झाले आहेत व उपलब्ध हाेत आहेत. हे भूखंड विकास आराखड्यानुसार उद्यान, बगिचे, क्रीडांगणे आणि इतर सुविधांसाठी आरक्षित आहेत.या भूखंडांचा पूर्ण क्षमतेने विकास करण्यासाठी या आरक्षित भूखंडांना प्रथम संरक्षित भिंत घालण्याचे नियाेजन आहे.जिल्हा विकास नियाेजन समितीच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळवून या भूखंडांचा आहे त्या सुविधांसाठी विकास करून नागरिकांना हे भूखंड उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.