महावितरण अधीक्षक अभियंतापदी सुरेश सवाईराम, संजय वाघमारे रुजू

    08-Jun-2026
Total Views |
 
 
maha
 
महावितरण पुणे ग्रामीण मंडलच्या अधीक्षक अभियंतापदी सुरेश सवाईराम पदाेन्नतीने, तर अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) या पदावर संजय वाघमारे बदलीद्वारे नुकतेच रुजू झाले झाले आहेत.यासाेबतच पुणे परिमंडलास 5 नवीन कार्यकारी अभियंतेही मिळाले आहेत. मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी पुणे परिमंडलात सर्वांचे स्वागत करून जाेमाने व ग्राहकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या.सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून सुरेश सवाईराम यांनी तत्कालिन वीज मंडळात 1994 मध्ये चिपळूण येथे सहाय्यक अभियंता म्हणून सेवेला सुरुवात केली. 2002 ते 2010 हातकणंगले येथे उपकार्यकारी अभियंता, 2010 ते 2014 नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, तर 2016 ते 2026 या काळात नाशिक शहर विभाग- 1, भांडूप शहर विभाग व सांगली ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केले आहे.