माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ विशेष भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात काेल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डाॅ. आसावरी जाधव यांची मुलाखत प्रसारित हाेणार आहे. हा कार्यक्रम साेमवारी (8 जून) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर अॅपवर प्रसारित केला जाणार आहे. ही मुलाखत काेल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व, वाढते वायू, जल व ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिक वापरामुळे हाेणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययाेजना याविषयी या मुलाखतीच्या माध्यमातून डाॅ. जाधव यांनी मार्गदर्शन केले आहे.