पूर्ण शक्तीनिशी विशिष्ट प्रकारे भक्ष्यावर झेप घेताे; त्यात नेमकेपणा असताे. तसेच दुसऱ्याने केलेली शिकारही ताे खात नाही. हा त्याचा ‘राॅयल’ गुण मानवाने अवश्य घ्यावा. कारण माणूस हा कारणाशिवाय दुसऱ्याला टाेमणे मारताे, दुखवताे आणि पुष्कळदा इतरांच्या जिवावर जगताे, ‘आयते’ खाताे. त्यापेक्षा आपल्या कामातच पूर्ण लक्ष असावे.
2. बक - बगळा पाण्यातील मासे हेरताना पाण्यात एका पायावर उभा राहून याेग्य संधीची वाट पाहताे आणि मग भक्ष्य मिळविताे. त्याची ही ‘एकाग्रता’ लक्षणीय आहे, ती जरूर शिकावी.