जादा साखर खाल्ल्यामुळे मेंदूतील पेशी नष्ट हाेऊ शकतात. न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या संशाेधकांच्या मते, 50 ग्रॅमपेक्षा जास्त साखर मेंदूच्या पेशींचे नुकसान करते व त्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम करते.यामुळे भविष्यात स्मरणश्नती कमी हाेण्याचा धाेका असताे.साखर मेंदूच्या त्या भागावर परिणाम करते जाे व्यवहार आणि स्मरणश्नतीसाठी जबाबदार असताे.संशाेधकांनी उंदरांच्या तीन गटांवर केलेल्या परीक्षणानंतर हा निष्कर्ष केला. संशाेधनासाठी वैज्ञानिकांनी उंदरांचे तीन गट बनवले.पहिल्या गटातील उंदरांना नऊ दिवसांसाठी वेगवेगळे ठेवले. दुसऱ्या गटातील उंदरांना साखर खाऊ घातली तर तिसऱ्या गटातील उंदरांना माेकळे साेडले. पंधरा दिवसांनंतर संशाेधकांना आढळले की, माेकळे साेडलेले उंदीर इतर दाेन गटांपेक्षाजास्त सुदृढ हाेते. वेगवेगळे ठेवलेल्या व साखर खाणाऱ्या उंदरांची तपासणी केली तेव्हा वैज्ञानिकांना आढळले की दाेन्ही गटातील उंदरांच्या मेंदूचे खूप नुकसान झाले आहे.साखर जास्त खाल्ल्यामुळे न्यूराॅन्सच्या विकासासाठी जबाबदार न्यूराॅड वन जीन प्रभावित हाेते. जे पुढे नैराश्य व तणावासारख्या आजारांचे कारण हाेऊ शकते.