न्यूयाॅर्क येथील प्राॅडक्ट डिझायनर निकाेल हॅमिलटनला तिचा लग्नाचा ड्रेस मिळाला. एक सुंदर ए-लाइन गाऊन, सुंदर मणी लावलेला, प्रत्येक टाका अचूक. पण ताे ड्रेस विकत घेताना तिला एका कागदपत्रावर सही करावी लागली.ताे साधा कागद नव्हता, तर एक कायदेशीर दस्तऐवज हाेता. त्यात नमूद केले हाेते की, ताे ड्रेस तिच्या शरीराला फिट हाेत नाही. कारण... निकाेलने गेल्या काही वर्षांत वजन कमी करणाऱ्या औषधांनी 50 पाउंड, म्हणजेच अंदाजे 23 किलाे वजन कमी केले आहे. तिच्या साखरपुड्यानंतरही तिने आणखी 7 किलाे वजन कमी केले आहे. ती इथेच थांबणार नाही.
औषधांमुळे झपाट्याने हाेते वजन कमी निकाेलसारख्या बातम्या आता अमेरिकन ‘वेडिंग इंडस्ट्री’त खळबळ माजवत आहेत. ओजेम्पिक आणि वेगाेवी सारखी GLP-1 औषधे इतक्या लवकर काम करतात की, काही महिलांना दर दाेन ते तीन आठवड्यांनी त्यांचे कपडे सैल वाटू लागतात.
वजन कमी करण्यामुळे व्यवस्था झाली विस्कळीत पूर्वी, वधूंच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये अशी परंपरा हाेती की, वधू लग्नाच्या पाच ते सहा महिने आधी आपला ड्रेस निवडायची, त्याची फिटिंग करून घ्यायची आणि सर्व काही अत्यंत काळजीपूर्वक केले जायचे. आता, ती संपूर्ण पद्धत विस्कळीत झाली आहे.
आयत्यावेळी कपडे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले
अमेरिकेतील सर्वात माेठ्या ब्राइडल रिटेलरच्या ‘डेव्हिड्स ब्रायडल’च्या सीईओ, केली कुक यांनी सांगितले की, अनेक वधू आता लग्नाच्या फक्त 45 दिवस आधी ड्रेस खरेदी करायला येतात.गेल्या दाेन वर्षांत, ‘रश ऑर्डर्स’ची, म्हणजेच चार आठवड्यांपेक्षा कमी वेळेत तयार हाेणाऱ्या ड्रेसची मागणी 50% नी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, कंपनी 3,000 हून अधिक टेलरिंग ए्नसपर्ट्सना ओव्हरटाईम काम करायला लावत आहे.
वजनाचा अंदाज लावणे झाले कठीण वधू-वर यांच्या एंगेजमेंटपासून लग्नापर्यंत कमी हाेणाऱ्या वजनाचा अंदाज लावणे आता कठीण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. ह्यूस्टन येथील एका ब्रायडल स्टुडिओच्या मालकीण, नताली हॅरिस, गेल्या 20 वर्षांपासून हे काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, पूर्वी अंदाज लावणे साेपे हाेते.जर वधूने 2-4 किलाे वजन कमी केले, तर ड्रेसमध्येही तेवढाच बदल व्हायचा.आता अंदाज लावणे अशक्य झाले आहे. काही वधूंचा बांधा पूर्वी सफरचंदासारखा हाेता. आता त्यांची संपूर्ण कंबर लक्षणीयरीत्या बारीक झाली. औषधे घेणाऱ्या वधूंनी झिपर्सऐवजी पाठीमागे लेस-अप असलेले ड्रेस घ्यावेत, कमरेपाशी घेरदार असलेल्या कटला प्राधान्य द्यावे, असे आम्ही सांगताे. त्यांमुळे वधूचा बदलता बांधा लपवता येईल.
लाखाे रुपयांच्या ड्रेसमध्ये वधूला हवी असते परिपूर्णता अमेरिकेत लग्नाच्या ड्रेसची सरासरी किंमत सुमारे 2 लाख रुपयांच्या आसपास आहे. डिझायनर गाऊनची किंमत 9.5 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. एवढा खर्च करणाऱ्या वधूंना प्रत्येक बाबतीत परिपूर्णता हवी असते. वधूच्या पाेशाखांच्या बाजारपेठेसमाेरील हे सर्वात माेठे आव्हान आहे.बारीक हाेण्याचे वेड मुलांमध्येही वरदेखील बारीक हाेत आहेत. पेनसिल्व्हेनियाच्या वेंडी इयानिरी सैलेनाें यांनी सांगितले की, केवळ वधूच नाही तर वर देखील वजन कमी करत आहेत. फरक इतकाच आहे की पुरुषांचे सूट सहजपणे अॅडजस्ट करता येतात. पण, वधूच्या गाऊनची गाेष्ट वेगळी आहे, प्रत्येक इंच कमी करणे हे एक आव्हान असते.