राज्याचे ‘क्वांटम व डीप टेक’ धाेरण लवकरच आणण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    05-Jun-2026
Total Views |
 

tech 
 
 
राज्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या पहिल्या क्वांटम धाेरण आणि महाराष्ट्र डीप टेक धाेरणास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धाेरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी या धाेरणांसंदर्भात बैठक झाली. इलेक्ट्राॅनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दाेन्ही धाेरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. राज्यात संशाेधन, नवाेन्मेष, गुंतवणूक आणि उच्च काैशल्याधारित राेजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दाेन्ही धाेरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.राज्याला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकाेनाचा हा भाग आहे. या दाेन्ही धाेरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशाेधन, नवाेन्मेष आणि राेजगार निर्मितीला माेठी चालना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.