ग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी

    05-Jun-2026
Total Views |
 
 

taxi 
राज्यात ऑनलाइन अ‍ॅप आधारित ग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखाे चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य व सामाजिक सुरक्षा निर्माण हाेण्यास मदत हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.सहकार टॅक्सी काे.ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपाेर्टचे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी. व्ही. सी. के. शर्मा, एस. टी. सी. एल. संचालक अर्चना सिंग, वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. राज्यात यापूर्वी ऑनलाइन अ‍ॅप आधारित ग्रीगेटर टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांकडून दिली जात आहे. सध्या या सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेच्या अभावासारख्या विविध समस्यांना सामाेरे जावे लागते. तसेच, नागरिक व प्रवाशांना विविध अडचणी व समस्या येतात, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्थेंच्या माध्यमातून सुरू करावयाच्या सेवेबाबत दरेकर यांनी माहिती दिली. कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे भारत टॅक्सी सेवेबाबत माहिती दिली.