ज्या कामात आपण संयत प्रयत्न कराल, त्या कामानंतर आपण निर्भर व्हाल, एकदम मुक्त हाेऊन जाल.काम करून टाकले गाेष्ट संपली.ऑफिसातला सगळा वेळ आपण ठीक श्रम करून सम्यकपणे घालवला असेल, तर ऑफिस आपणाबराेबर घरी येणार नाही. नाहीतर मात्र घरी येईल, येणारच. सस्पेंडेड डाे्नयात ऑफिसचे काम लटकतच राहणार, कारण तिथे बसून आराम केला ना.मी ऐकलंय एके दिवशी एका ऑफिसात मालकाने अचानक मॅनेजरला भेट दिली. त्याच्या येण्याची ती वेळ नव्हती, असती तर मॅनेजर तयार राहिला असता. पण अचानक मालक आत आला. मॅनेजर आपले पाय पसरून खुर्चीवर डाराडूर झाेपला हाेता. मालकांची चाहूल लागताच मॅनेजर जागा झाला. वचकला घाबरून क्षमा मागू लागला अन् म्हणाला, ‘माफ करा काल रात्री घरी झाेप नाही झाली.’ मालक म्हणाला, ‘म्हणजे तुम्ही घरी पण झाेपता तर. घरी झाेपता असे काही मला वाटत नाही.
इथे जर दिवसभर झाेपत असाल तर घरी कसे झाेपाल असे आपले आम्हाला वाटते.’ म्हणून सध्या आपण माेठ्या विचित्र अवस्थेत आहाेत.जेव्हा स्वयंपाकघरात बसून आपण जेवण करीत असताे तेव्हा आपण ऑफिसात असताे. जेव्हा ऑफिसात असताे तेव्हा जेवण करीत असताे. हे सगळं असंच चालतं. अशा प्रकारचे वागणे आपल्या डाे्नयात इतका गाेंधळ निर्माण करीत असते की जेव्हा जेवण करताे तेव्हा आपण सम्यकपणे जेवण करू शकत नाही. जेवायच्या वेळी बाकी सगळ्या गाेष्टींना फाटा द्या. जेवणाकडे जितके लक्ष दिले पाहिजे तेवढे द्या. जितके चावायला पाहिजे तितके चावा. जितका स्वाद घेता येईल तितका घ्या. जितके जेवण करायचे आहे तितके करा. जेवण करीत असताना सम्यक प्रयत्न करा आणि कृपा करून मगच थाळीवरून उठा, मग भाेजन आपला पिच्छा करणार नाही.