मुंबई विमानतळ, गेट वे ऑफ इंडियाची म्यानमारच्या अध्यक्षांनी पाहणी केली

    05-Jun-2026
Total Views |
 

mumbai 
 
भारत दाैऱ्यावर आलेले म्यानमारचे अध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी येथील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया आणि मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली.यावेळी त्यांच्यासाेबत म्यानमारचे शिष्टमंडळ, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.यू मिन आंग ह्लाईंग यांनी गेट वे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारशाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या भव्य स्मारकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. गेट वे ऑफ इंडियाची वैशिष्ट््ये, बांधकामातील कलात्मकता; तसेच भारताच्या इतिहासातील स्थान याविषयी त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही त्यांनी पाहणी केली.
 
पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी साेयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद ‘इमिग्रेशन’ सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर यू मीन आँग ह्लाओंग व त्यांचे शिष्टमंडळ मायदेशी रवाना झाले. वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे, म्यानमारमधील भारतीय राजदूत अभय ठाकूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डाॅ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पाेलिस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी साैरभ कटियार, म्यानमारचे महावाणिज्यदूत माेहनराव पिंपळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.