काही काळापूर्वी एका 66 वर्षांच्या व्यक्तीची केस आली. ते तसे तर निराेगी हाेते, पण त्यांना बाहेरचे खाण्याची आवड हाेती. त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी मनसाेक्तपणे गाडीवरची पाणीपुरी आणि रगडा-पॅटीस खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पाेटात थाेडे गडबड असल्यासारखे वाटले. तिसऱ्या दिवशी सामान्य ताप, उलट्या, अशक्तपणा (वीकनेस) जाणवू लागला आणि त्याच्या पुढच्या दिवशी त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना तातडीने हाॅस्पिटलमध्ये न्यावे लागले.नर्सिंग हाेमच्या डाॅक्टरांनी तपासणी केली तेव्हा समजले की त्यांना अक्यूट लिव्हर फेल्युअर झाले आहे आणि माेठ्या हाॅस्पिटलमध्ये तातडीने हलवणे गरजेचे आहे. त्यानंतर ती केस आमच्याकडे आली.त्यांना ट्रान्सप्लांटची (प्रत्याराेपणाची) गरज हाेती, म्हणून आम्ही तातडीने ट्रान्सप्लांट केले आणि त्यांचे प्राण वाचले.
ऐकताना हे जितके असंभव वाटते, तितकेच ते प्रत्यक्षात घडत असते. अक्यूट लिव्हर फेल्युअर याच पद्धतीने हाेत असते.माणसाला काहीही झालेले नसते आणि अचानक परिस्थिती गंभीर हाेते. बऱ्याच वेळा तर चाैथ्या दिवशी माणूस एकतर काेमामध्ये जाताे किंवा मृत्यू पावताे. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही, तर या आजाराची गांभीर्यता समजावून सांगत आहे. जर वेळ हातातून निघून गेली,तर रुग्णाला आपण वाचवू शकत नाही.अशा रुग्णांवर नर्सिंग हाेमच्या पातळीवर उपचार देखील हाेऊ शकत नाहीत. त्यांना तातडीने माेठ्या हाॅस्पिटलमध्ये हलवावे लागते. असे घडल्यास रुग्णाला तातडीने अशा हाॅस्पिटलमध्ये नेले पाहिजे जिथे लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्याराेपण) शक्य असेल.
जर उपचाराचा विचार केला, तर एका प्रमाणानुसार (रेशिओनुसार) या रुग्णांपैकी 25 टक्के रुग्णांना ट्रान्सप्लांटची गरज भासते. दुसरे 25 टक्के रुग्ण या आजारामुळे मृत्यू पावतात. उर्वरित 50 टक्के रुग्ण तातडीने इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये हाेणाऱ्या उपचारांद्वारे बरे हाेतात. रुग्णाची परिस्थिती पाहून डाॅक्टर्स हा निर्णय घेऊ शकतात की त्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही. या अचानक ओढवणाऱ्या परिस्थितीसाठी मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवावी लागते. घरातील काेण काेणाला लिव्हर डाेनेट (दान) करू शकते, हा निर्णय देखील त्वरित घ्यावा लागताे, कारण तातडीने एखाद्या कॅडेव्हर डाेनरचे (मृतदेहाचे) लिव्हर मिळणे कठीण असते.
हा आजार असा आहे की या प्रकारच्या निर्णयात उशीर चालत नाही. असे घडल्यास रुग्णाला त्वरित हाॅस्पिटलमध्ये शिफ्ट करून पुढील प्रक्रियेसाठी मानसिक तयारी ठेवणे आवश्यक बनते.या प्रकारच्या केसेसमध्ये सतर्कता अतिशय अनिवार्य ठरते. जर अचानक असे काही घडले, तर याेग्य हाॅस्पिटलमध्ये वेळेवर पाेहाेचल्यास वाचण्याची शक्यता जास्त असते.