मेळघाटात प्रभावी आराेग्य सुविधा पुरवण्याचे, तसेच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील आराेग्य सुविधांच्या बळकट करण्याचे निर्देश आराेग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आबिटकर यांनी हे निर्देश दिले.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यावेळी उपस्थित हाेते. मेळघाट भागास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित भेट द्यावी, असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासह, कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावावर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.