नेदरलँडमध्ये जगातील सर्वांत माेठे ‘ट्यूलिप गार्डन’ आहे

    05-Jun-2026
Total Views |
 
 

garden 
हा फाेटाे नेदरलँडच्या लिसे शहरात असलेल्या जगातील सर्वांत माेठ्या आणि सुंदर ‘केकेनहाेफ गार्डन’च्या ट्यूलिप शेतीचा आहे. तिथे ट्यूलिप फेस्टिव्हल झाला. आता ते पर्यटकांसाठी खुले झाले आहे. ‘गार्डन ऑफ युराेप’ या नावाने प्रसिद्ध हे गार्डन सुमारे 79 एकरांत पसरले आहे. या गार्डनमध्ये 800 पेक्षा जास्त प्रजातींची 70 लाखांपेक्षा जास्त ट्यूलिप, डॅफाेडिल्स आणि जलकुंभीची (जलपर्णीची एक प्रजाती) फुले उमलली आहेत. त्यांच्या बियाणांची पेरणी हाताने केली जाते. 70 लाख फुले असलेली ही जागा जणू सप्तरंगी कार्पेटप्रमाणे दिसते. हे पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखाे लाेक पाेहाेचतात. पर्यटक इथे केवळ पायीच नाही, तर कालव्यांतून बाेटिंग करताना सुद्धा या दृश्याचा आनंद घेतात. पर्यटक 100 वर्षे जुन्या पवनच्नकीवरून गार्डनचे अप्रतिम हवाई दृश्य आणि मैलाेन्मैल पसरलेल्या फुलांच्या शेतांमध्ये सायकल चालविण्याचा आनंद सुद्धा घेतात. इथून दरवर्षी अब्जावधी ट्यूलिपची निर्यात हाेते. फुलांचा हा व्यवसाय नेदरलँडच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. हे जादुई दृश्य फ्नत मार्च ते मे महिन्यापर्यंतच पाहायला मिळते.