अनेक हुशार विद्यार्थ्यांचे ध्येय मेडिकल- इंजिनीअरिंगच्या उत्कृष्ट शिक्षणासाठी सर्वाेच्च शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणे हेच असते. भारतातील सर्वाेच्च रँकच्या मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12वी नंतर एनईईटी (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षा हाेते. इंजिनीअरिंग काॅलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई (जाॅइंट एन्ट्रन्स एक्झाम) हाेते. जेईई मेनच्या मेरिट लिस्टच्या आधारे देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एन.आय.टी.), आय.आय.टी. काॅलेज, केंद्र सरकारतर्फे अर्थसहाय्य हाेणाऱ्या इंजिनीअरिंग काॅलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे या परीक्षाचे महत्त्व खूप वाढले आहे.ज्ञानापेक्षा मा्नर्सला महत्त्व देणारी शिक्षण पद्धत ‘गुगल’ सह विविध कंपन्या आता विद्यार्थ्यांच्या पदवी, गुणांपेक्षा संबंधित विषयातील सखाेल ज्ञानाला महत्त्व देत आहेत. तरीही भारतात मा्नर्सच्या शर्यतीची शक्षण पद्धती नष्ट हाेऊ शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आता तर जगातील सर्वाेच्च युनिव्हर्सिटीकडून ऑनलाइन शिक्षणही उपलब्ध आहे. त्यात भर म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक जाॅब्स हिरावून घेणार आहे, तरीही त्या आव्हानाकडे दुर्लक्ष करून अजूनही जुन्या मानसिकतेसह शिक्षण जग चालत आहे.
राजस्थानमधील काेटात येतात लाखाे विद्यार्थी राजस्थानमधील काेट्यात देशभरातून सरासरी अडीच लाख विद्यार्थी काेचिंगसाठी येतात. जेईई अॅडव्हान्सच्या टाॅपर्स लिस्टमध्ये स्थान मिळवण्याचे त्यांचे स्वप्न असते. तर एनईईटी (नीट) साठी 1.5 लाख विद्यार्थी काेट्याला आपली कर्मभूमी बनवतात.काेचिंग कॅपिटल बनले काेटा काही शिक्षकांनी 1980च्या दशकात सुरू केलेले ट्यूशन माॅडेल आज अब्जावधी रुपयांच्या उद्याेगात बदलले आहे.
आज काेट्याला भारताची ‘काेचिंग कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. देशातील एखाद्या शहराच्या लाेकसंख्येइतके विद्यार्थीच जर काेचिंगसाठी असतील, तर त्यांच्यासाठी शिक्षक, राहण्यासाठी घरे, हाॅस्टेल, कॅन्टीन, ढाबा, रेस्टाॅरंट, पेइंग गेस्ट सवलत, मेस, बुक स्टाेअर, स्टेशनरी दुकाने, झेराॅक्स सेंटर्स, बँक, रिअल इस्टेटचे जग आणि त्यामध्ये समाविष्ट असलेला स्टाफ, व्यापारी वर्ग हे सर्व एकत्र केले तर कदाचित जगातील अशी एकमेव काेचिंग नगरी असेल. याला संपूर्ण शैक्षणिक इकाे सिस्टीम देखील म्हणता येईल.काेचिंग ्नलासचा झाला उद्याेग भारतात सध्या रु. 58,000 काेटींचा काेचिंग उद्याेग आहे. काेचिंग क्षेत्राने उद्याेगाएवढा आकार व्यापला आहे.देशात मार्केट केंद्रीत शिक्षणाची अनिष्ट प्रथा कमी हाेण्याऐवजी अजून माेठे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणार आहे. काेचिंग उद्याेगाचे मूल्य 2031 मध्ये रु. 1.45 लाख काेटींपर्यंत हाेईल असे मानले जाते.
ही वृद्धी केवळ आकडे दाखवत नाही. त्यामागे दिसतात पालकांच्या चिंता, विद्यार्थ्यांचे संघर्ष आणि संस्थेच्या यशाच्या कहाणीचा परिणाम आहे. जीएसटी उत्पन्नामध्येही या उद्याेगाची वृद्धी दिसून येत आहे. केवळ चार वर्षांत रु. 2,240 काेटींवरून रु. 5,517 काेटींपर्यंतची माेठी झेप नाेंदवली गेली आहे.काेचिंगची फी लाखांमध्ये काेटा येथे आयआयटी- जेईई साठी दाेन वर्षांचा काेर्स सामान्यतः रु. 8 ते रु. 12 लाखांपर्यंत असताे. परंतु जेव्हा हाॅस्टेल, मेस, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज आणि इतर खर्च जाेडले जातात, तेव्हा एकूण खर्च रु. 15 ते रु. 25 लाखांपर्यंत पाेहाेचताे. काेटा येथील काेचिंगद्वारे हाेणारी वार्षिक कमाईच रु. 7,000 काेटी इतकी आहे. असेच काहीसे गणित ‘नीट’ परीक्षेसाठीचे आहे.पालकांवर येताे भार अनेक माता-पित्यांसाठी हा खर्च सहन करणे साेपे नाही. लाेक जमिनी विकतात, कर्ज घेतात, साेन्याचे दागिने गहाण ठेवतात.पण, ही गुंतवणूक नेहमी यशात बदलते का, हा प्रश्न आहे.