शाहिद कपूर हा उत्तम अभिनेता अनेक विषयांवर फार तयारीने बाेलताे. सिनेमातले अभिनेते म्हणजे फक्त पडद्यावरचं त्यांचं काम बघा, बाकी बाेलणं सपाट, इतर कशात रस नाही, गती नाही, अशी एक समजूत असते. अनेक अभिनेते तसे असतातही.पण सैफ अली खानसारखे उत्तम वाचक अभिनेते आहेत, जान्हवी कपूरसारखी उत्तम जगभान असलेली अभिनेत्री आहे, या यादीत शाहिदही आहे.ताे अभिनेता-अभिनेत्री या जाेडीचा मुलगा असला तरी टिपिकल नेपाे किड नाही (व्यापार, वकिली, डाॅक्टरकी, राजकारण या सगळ्यात वारसा हक्क चालवणाऱ्या देशाने फक्त हिंदी सिनेमातल्या नटांच्या मुलांना नेपाे किड म्हणणं हास्यास्पदच आहे म्हणा), ताे खूप संघर्ष करून पुढे आलेला आहे. एका मुलाखतीत ताे मानसिक आराेग्याबद्दल बाेलला आहत्यात ताे म्हणताे, मी 44 वर्षांचा आहे, म्हणजे असं समजा की मी 44व्या मजल्यावर राहताे आहे. माझ्या घरात वीज सारखी येते जाते. मी घरातली सगळी वायरिंग तपासताे, बदलताे, बरंच काही करताे, पण प्राॅब्लेम सुटत नाही. कारण फ्यूज तळमजल्यावर आहे.ताे नादुरुस्त आहे. त्याची दुरुस्ती तिथे जाऊन केली पाहिजे. बालपणातले काही काॅम्प्लेक्स या वयातही भेडसावत असतील, तर त्यांची दुरुस्तीही तिथे जाऊन करावी लागेल ना? कमाल उदाहरण आहे हे.