आषाढी वारी साेहळा शांततेत व नियाेजनबद्ध पद्धतीने पार पाडावा; तसेच वारीत वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने काटेकाेर नियाेजन करावे, असे निर्देश साेलापूरचे पालक मंत्री जयकुमार गाेरे यांनी येथे आढावा बैठकीत दिले.पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यातील अडथळे, रिंगण साेहळ्याचे ठिकाण, पालखी मुक्कामाची ठिकाणे, रस्ते व पूल दुरुस्ती, अशी अन्य सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत.पालखी मार्गावर लावण्यात येणारे फिरते शाैचालय, तसेच कायमस्वरूपी शाैचालय स्वच्छ ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तात्पुरत्या शाैचालयाजवळ चिखल, राडाराडा हाेऊ नये, तसेच पालखी मुक्कामस्थळी याेग्य तेथे काँक्रीटीकरण व मुरमीकरण दिलेल्या वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना गाेरे यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या नियाेजनाची माहिती सादर केली. ग्रामीण भागातून पालखी पुढे गेल्यानंतर व आधी स्वच्छता करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेतर्फे पालखी मार्गावरील स्वागत कमानी, फिरते शाैचालय 5000, पाण्याचे टँकर 220, तात्पुरती उपचार केंद्रे 158, बाइक अॅम्बुलन्स 121, मेडिसिन किट 4500 हे दिंडीप्रमुखांना वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, तसेच माेबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावेआणि वाहनांना टाेल माफी मिळावी, अशी मागणी माऊलींच्या पालखी साेहळ्याचे विश्वस्त ङ राजेंद्र उमाप यांनी केली. संत तुकाराम पालखी विश्वस्त व साेपानकाका पालखी विश्वस्तांनीही वारकऱ्यांना आवश्यक त्या साेयीसुविधा देण्याची मागणी केली.